एक्स्प्लोर
शॉक लागून खांबावरच प्रशिक्षणार्थी वीज कर्मचाऱ्याचा मृत्यू
पाचोरा तालुक्यातील सुरेश बंजारा हा 23 वर्षीय युवक साक्री वीज वितरण कंपनीत प्रशिक्षणार्थी कर्मचारी म्हणून कार्यरत होता. उच्चदाब वाहिनी वरील दुरुस्तीचे काम करतांना वीज प्रवाह अचानक सुरु झाल्याने त्याचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला.
धुळे : प्रशिक्षणार्थी वीज कर्मचाऱ्याचा शॉक लागून विजेच्या खांबावरच मृत्यू झाला. साक्री तालुक्यातील सुरपाणा शिवारात ही दुर्घटना घडली.
पाचोरा तालुक्यातील सुरेश बंजारा हा 23 वर्षीय युवक साक्री वीज वितरण कंपनीत प्रशिक्षणार्थी कर्मचारी म्हणून कार्यरत होता. उच्चदाब वाहिनी वरील दुरुस्तीचे काम करतांना वीज प्रवाह अचानक सुरु झाल्याने त्याचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला.
उच्चदाब वाहिनी असलेल्या विजेच्या खांबावर प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्याला चढू देऊ नये, असा वीज वितरण कंपनीचा नियम आहे. मात्र या नियमाचे घटनास्थळी उल्लंघन झाल्याचे दिसून येते आहे.
या घटनेने वीज वितरण कंपनीतील कर्मचाऱ्यांचा सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या प्रशिक्षणार्थी वीज कर्मचाऱ्याच्या मृत्यूला जबाबदार कोण? असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement