Sharad Pawar: लोकशाहीत प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार- शरद पवार
Sharad Pawar: साहित्य संमेलन सुरू असताना असा प्रकार घडल्यानं त्यावर राजकीय गोटातून दोन्ही बाजूनं प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
Sharad Pawar: नाशिक येथील 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर (Girish Kuber) यांच्यावर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी शाईफेक केलीय. या घटनेचा विविध स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. साहित्य संमेलन सुरू असताना असा प्रकार घडल्यानं त्यावर राजकीय गोटातून दोन्ही बाजूनं प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवारांनी (Sharad Pawar) आपली प्रतिक्रिया दिलीय.
'लोकसत्ता'चे संपादक गिरीश कुबेर हे आज साहित्य संमेलनात एका परिसंवादात सहभागी होणार होते. या परिसंवादात सहभागी होण्याआधीच त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली. या घटनेनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात थिणगी पडलीय. या घटनेवर विविध स्तरातून संतापजनक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. याचदरम्यान, शरद पवार म्हणाले की, "लोकशाहीत प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. तसेच प्रत्येकाला विरोध करण्याचाही अधिकार आहे, पण व्यक्तिगत हल्ला चुकीचा आहे", असं शरद पवारांनी म्हटलंय.
गिरीश कुबेर यांच्या ‘रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकावरून वाद सुरू होता. या पुस्तकातील मजकूराबाबत अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. गिरीश कुबेर यांच्या ‘रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकात छत्रपती संभाजीराजे यांची बदनामी करण्यात आला असल्याचा आरोप याआधीच संभाजी ब्रिगेडने केला होता. या पुस्तकावर बंदी घालावी अशी मागणी करण्यात येत होती.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
हे देखील वाचा-