संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंचे वक्तव्य असंसदीय, हक्कभंग प्रस्ताव आणणार: शंभुराज देसाई
निवडणुकीत ज्याच्यासोबत मतं मागितली त्यांच्याच विरोधात सरकार बनवलं ही लोकशाही आहे का असा सवाल देसाईंनी केला
मुंबई : आमदार अपात्रता प्रकरणी (MLA Disqualification Case) आलेल्या निकालानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि आमदार आदित्य ठाकरेंनी (Aaditya Thackeray) असंसदीय भाषेत वक्तव्य केले, त्यांच्या विरोधात हक्कभंग आणण्यासाठी आमची प्रक्रिया सुरू झालीय, अशी माहिती शिवसेना शिंदे गटाचे उत्पादन शुल्कमंत्री मंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी दिली आहे. ते मुंबईत बोलत होते. तसेच कालचा निकाल विधानसभा अध्यक्षांनी कायद्याच्या चौकटीत राहून दिल्याचे शंभुराज देसाई यांनी स्पष्ट केले आहे.
शंभुराज देसाई म्हणले, आमदार अपात्रता प्रकरणचा निकाल संपूर्ण न्यायालयीन प्रक्रिया पार पाडून देण्यात आलेला आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेची मागणी कशी चुकीची हे अध्यक्षांनी सांगितले आहे. 54 पैकी 70 आमदार शिंदेंसोबत आहे. आम्ही शिवसेना सोडलेली नाही, दुसऱ्या गटात गेलो नाही. नैसर्गिक युतीत निवडून आलो असताना उद्धव ठाकरेंच्या भूमिकेमुळे ज्यांच्या विरोधात निवडणूक लढवली त्यांच्यासोबत इच्छेविरोधात सरकारमध्ये सहभागी झालो. सरकार स्थापन करताना दोन- तीन हॉटेलमध्ये आम्हाला ठेवले. त्यावेळी पक्ष प्रमुखांकडे भाजप शिवसेनेचं सरकार असलं पाहिजे हे वारंवार म्हणत होतो. जर मॅचफिक्सिंग असती तर 14 आमदारही अपात्र ठरवले गेले असते. ठाकरे गटाने न्यायालयात जावं,आम्ही देखील न्यायालयात आमची बाजू मांडू.
मतं मागितली त्यांच्याच विरोधात सरकार बनवलं ही लोकशाही आहे का? : शंभुराज देसाई
कालचा निकाल हा लोकशाहीच्या इतिहासातला हा काळा दिवस आहे अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली. त्याला शंभूराज देसाईंनी प्रत्युत्तर दिलंय. निवडणुकीत ज्याच्यासोबत मतं मागितली त्यांच्याच विरोधात सरकार बनवलं ही लोकशाही आहे का असा सवाल देसाईंनी केला. तिथे राऊतांनी नाही का लोकशाहीला तिलांजली वाहिली,असेही देसाई म्हणाले.
मतदारसंघातील कामं घेऊन का येता? रोहित पवारांचा सवाल
रोहित पवार यांना वाटत असेल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री काम करत नाहीत, तर मग मतदारसंघातील कामं घेऊन का येता? रोहित नैराश्येतून असं बोलतायत, अशी टीका शंभुराज देसाई यांनी रोहित पवारांवर केली आहे. एकीकडे मतदार संघातील काम घेऊन यायचे आणि बाहेर राजकीय टीका करायची. राष्ट्रवादीबाबतही असाच निर्णय येईल ही धाकधूक रोहित यांच्या मनात आहे त्यामुळे नैराश्यातून ते बोलतं आहेत.
महाराष्ट्रातून संपूर्ण गँगवार संपवणार आहे
शरद मोहोळ हत्येचा कट रचला गेला आणि त्याचे आरोपी कोण हे सर्व गाऱ्हाण मांडण्यासाठी मोहोळ यांच्या पत्ननीने फडणवीस जेव्हा पुणे दौऱ्यावर असताना भेट घेतली आणि न्यायाची मागणी केली. नितेश राणे त्यांच्या घरी सांत्वन करायला गेले होते त्याला कारण असे की, अनेक हिंदू संघटनेचे मेळावे त्या दोघांनी केले होते. ज्या दिवशी शरद मोहोळची हत्या झाली तेव्हाच फडणवीसांनी गृहमंत्री म्हणाले की, महाराष्ट्रातून संपूर्ण गँगवार संपवणार आहे, असेही शंभुराज देसाई म्हणाले.
हे ही वाचा :