Inflation : होळी आता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. होळीच्या आनंदात एक चिंता वाढवणारी बातमी आहे, कारण होळीच्या तोंडावर चिकन, मिरची, अंडी, मॅगी, कॉफी आदी वस्तूंच्या दरात वाढ झालेली दिसत आहे, त्यामुळे होळी दरम्यान चिकन खायची इच्छा असणाऱ्यांना खिसा खाली करावा लागणार आहे. वाढत्या महागाईने सर्व सामान्य घरातील गृहिणींचे बजेट पूर्णत: कोलमडलेले दिसून येत आहे. त्यामुळे सरकारवर नाराजी व्यक्त केली जात आहे. जाणून घेऊया विविध पदार्थांचे भाव


चिकन आणि मिरचीच्या भावात वाढ


रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर जवळपास अनेक वस्तूंच्या किंमती गगनाला भिडत आहेत. अशातच आता नेमक्या होळी सणाच्या पार्श्वभूमीवर चिकन आणि मिरचीचे दर वाढले आहेत. वसई विरारमदध्ये चिकनचे दर चक्क 300 रुपये किलोवर गेले आहेत. तर ठाण्यात मिरचीचे भाव देखील चांगलेच वाढले आहे. हिरव्या मिर्चीच्या दरांनी देखील घाऊक बाजारात शंभरी पार केली आहे. 40 ते 50 रुपये किलो मिळणारी हिरवी मिर्ची आता किरकोळ बाजारात 150 ते 160 रुपयानं विकली जात आहे. अवकाळी पाऊस, दिवसेंदिवस वाढलेल्या पेट्रोल,डिझेल आणि CNG च्या दरामुळे ठाणे-मुंबईमधील भाजी मंडईत होणाऱ्या आयात आणि निर्यातींवर होऊ लागला आहे. 


मॅगीचे दर वाढले


दोन मिनिटात तयार होणारी मॅगीच्या ( Maggi ) किंमतीत वाढ झाली आहे. मॅगीसोबतच चहा आणि कॉफीच्या किंमतीतही वाढ झाली आहे. त्यामुळे यापुढे मॅगी, चहा आणि कॉफी घेण्यासाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे हैराण झालेल्या लोकांना आणखी एक झटका बसला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती शंभरीपार गेल्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट आधीच कोलमडले आहे. त्यात भर म्हणून आता मॅगी, चहा आणि कॉफीही महागणार आहे. 12 रुपये किंमतीची मॅगी खरेदी करण्यासाठी आता जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. नेस्ले आणि एचयूएल यांनी आपल्या प्रोडक्ट्सच्या किंमती वाढवल्या आहेत. नेस्लेने मॅगीच्या किंमतीमध्ये 9 ते 16 टक्केंपर्यंत वाढ केली आहे. नवीन किंमती आजपासून लागू होणार आहेत. मॅगीचा 12 रुपयांचा पॅक 14 रुपयांना मिळणार आहे.


अंडीही महागण्याची शक्यता


चिकन महागले असताना त्यातच कोंबड्याचं खाद्यही महागले आहे. तसेच बर्डफ्लूनंतर कोबड्यांचे उत्पादन घटल्याने ही दरवाढ करण्यात आली आहे. तर दुसरीकडे कुक्कुटखाद्य महाग झाल्याने अंडीही महागण्याची शक्यता आहे. पक्ष्यांना लागणाऱ्या खाद्याच्या दरात सुमारे 60 टक्के वाढ झाली आहे. प्रत्येक अंड्यामागे सव्वा रूपये तोटा होत असल्यामुळे अंड्याचे दर वाढण्याची शक्यता आहे. 


कॉफीच्या किंमती किती वाढल्या? - 
कॉफीच्या किंमतीमध्येही वाढ झाली आहे. Bru च्या किंमतीमध्ये तीन ते सात टक्केंनी वाढ झाली आहे. त्याशिवाय ब्रू गोल्ड कॉफीच्या किंमतीत तीन ते चार टक्के वाढ झाली आहे. 


चहा किती रुपयांना झाला?
इंस्टेन्ट कॉफीच्या पाकिटाची किंमत तीन ते 6.66 टक्क्यांनी वाढली आहे. त्याशिवाय ताजमहल कंपनीच्या चहाची किंमत 3.7 ते 5.8 टक्केंनी वाढली आहे. ब्रूक बॉन्डचा चहाची किंमत 1.5 ते 14 टक्केंनी वाढला आहे.


नेस्कॅफे कॉफीही महागली -
नेस्ले इंडियाच्या A+milk च्या एक लीटर वाल्या पाकिटाची किंमत चार टक्केंनी वाढली आहे. त्यामुळे या पाकिटाची किंमत 78 रुपये झाली आहे. याआधी हे पाकिट 75 रुपयांना मिळत होते. नेस्कॅफे क्लासिकच्या 25 ग्रॅम वाल्या पाकिटाची किंमत 2.5 टक्केंनी वाढून 80 रुपयांना झाली आहे. याची किंमत आधी 78 रुपये होती.  नेस्कॅफे क्लासिक 50 ग्रॅमच्या पाकिटाची किंमत 145 रुपयांवरुन 150 रुपये झाली आहे. 


संबंधित बातम्या


Price Hike : ‘दोन’ मिनिटात झटका! मॅगी, कॉफी अन् चहा महागला


Fuel Price Hike: विधानसभा निवडणूक निकालाने भाजपला दिलासा! इंधन दरवाढीचं काय होणार?


घरगुती मसाले तयार करण्याच्या हंगामात मिरचीचे दर गगनाला, किलोमागे 50 ते 60 रुपयांची दरवाढ