Maggi price hike : दोन मिनिटात तयार होणारी मॅगीच्या ( Maggi ) किंमतीत वाढ झाली आहे. मॅगीसोबतच चहा आणि कॉफीच्या किंमतीतही वाढ झाली आहे. त्यामुळे यापुढे मॅगी, चहा आणि कॉफी घेण्यासाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे हैराण झालेल्या लोकांना आणखी एक झटका बसला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती शंभरीपार गेल्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट आधीच कोलमडले आहे. त्यात भर म्हणून आता मॅगी, चहा आणि कॉफीही महागणार आहे.


12 रुपये किंमतीची मॅगी खरेदी करण्यासाठी आता जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. नेस्ले आणि एचयूएल यांनी आपल्या प्रोडक्ट्सच्या किंमती वाढवल्या आहेत. नेस्लेने मॅगीच्या किंमतीमध्ये 9 ते 16 टक्केंपर्यंत वाढ केली आहे. नवीन किंमती आजपासून लागू होणार आहेत. maggi price list


किती रुपयांनी महागली मॅगी? -
12 रुपयांना मिळणारे 70 ग्रॅमचं मॅगी मसला नूडल्सचे (Maggi Masala noodles पाकिट आता 14 रुपयांना झाले आहे. मॅगीच्या 70 ग्रॅमच्या पाकिटाची किंमतीमध्ये दोन रुपयांची वाढ झाली आहे. तर 140 ग्रामच्या पाकिटाची किंमतीत तीन रुपयांनी महाग झाली आहे. 560 ग्रॅमच्या पाकिटाची किंमतीत 9.4 टक्केंनी वाढ झाली आहे. 96 रुपयांना मिळणारे मॅगी पाकिट आता 105 रुपयांना मिळणार आहे.


कॉफीच्या किंमती किती वाढल्या? - 
कॉफीच्या किंमतीमध्येही वाढ झाली आहे. Bru च्या किंमतीमध्ये तीन ते सात टक्केंनी वाढ झाली आहे. त्याशिवाय ब्रू गोल्ड कॉफीच्या किंमतीत तीन ते चार टक्के वाढ झाली आहे. 


चहा किती रुपयांना झाला?
इंस्टेन्ट कॉफीच्या पाकिटाची किंमत तीन ते 6.66 टक्क्यांनी वाढली आहे. त्याशिवाय ताजमहल कंपनीच्या चहाची किंमत 3.7 ते 5.8 टक्केंनी वाढली आहे. ब्रूक बॉन्डचा चहाची किंमत 1.5 ते 14 टक्केंनी वाढला आहे.


नेस्कॅफे कॉफीही महागली -
नेस्ले इंडियाच्या A+milk च्या एक लीटर वाल्या पाकिटाची किंमत चार टक्केंनी वाढली आहे. त्यामुळे या पाकिटाची किंमत 78 रुपये झाली आहे. याआधी हे पाकिट 75 रुपयांना मिळत होते. नेस्कॅफे क्लासिकच्या 25 ग्रॅम वाल्या पाकिटाची किंमत 2.5 टक्केंनी वाढून 80 रुपयांना झाली आहे. याची किंमत आधी 78 रुपये होती.  नेस्कॅफे क्लासिक 50 ग्रॅमच्या पाकिटाची किंमत 145 रुपयांवरुन 150 रुपये झाली आहे.