मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील तीन पक्ष आणि भाजप यांच्यात दिवसेंदिवस वाद वाढत चालला आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये भाजप द्वारे तपास यंत्रणांचा गैरवापर करत महाविकास आघाडी नेत्यांवर कारवाई केली जातेय असं आघाडी नेत्यांच म्हणणं आहे. त्यातच आता महाविकास आघाडी सरकारने ही भाजप नेत्यांविरोधात  पाऊलं उचलायला सुरुवात केली आहे असं दिसतय. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर भाजप करत असल्याचा वारंवार आरोप महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी केलेला आहे. प्रताप सरनाईक, रविंद्र वायकर, भावना गवळी,  अनिल परब, अनिल देशमुख, अर्जुन खोतकर, आनंदराव अडसुळ  या नेत्यांना ईडी आयटीच्या चौकशांना सामोरं जावं लागलं आहे या सगळ्या कारवाया होत असताना महाविकास आघाडी सरकार  विरोधकांवर कारवाई होणार असं चित्र दिसत होतं त्यातच अडीच वर्षानंतर महाविकास आघाडी सरकार आक्रमक भूमिकेत दिसत आहे. महाविकास आघाडी सरकारच्या  निशाण्यावर कोण कोणते नेते आहेत हे आपण पाहणार आहोत .


दरेकरांपासून सुरुवात ...


मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मजूर वर्गातून निवडणूक लढवणारे भाजप नेते प्रवीण दरेकर यांना मोठा झटका बसला आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांकडून प्रवीण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई बँकेची मध्यवर्ती शाखा फोर्ट परिसरात असल्याने तेथील माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यानंतर भाजपचे नेते आक्रमक झाले आहेत. राज्य सरकारने सूडबुद्धीने ही कारवाई केल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. 


विरोधकांवर कारवाई  होणार...


आम्ही मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून संजय पांडेंना आणलं आहे. त्यांच्याकडे सीएम कार्यालयातून एक यादी देण्यात आली आहे. या यादीच्या आधारे आम्ही विरोधकांवर कारवाई करणार आहोत. त्यात पहिलं नाव प्रवीण दरेकरांचं आहे, असं आम्हाल सत्ता पक्षातील लोकांनी सांगितलं आहे असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.



कोण कोणत्या नेत्यांवर आतापर्यंत कारवाई?


खासदार नारायण राणे  यांना त्यांच्या वक्तव्यावरून तसेच पुत्र आमदार नितेश राणे यांच्यावर हल्ला प्रकरणी यापूर्वी कारवाई करण्यात आली होती. तसेच नुकतच गिरीश महाजन यांना देखील जळगाव प्रकरणी ,मोहित कंबोज यांच्यावर तलवार दाखवल्या प्रकरणी आतापर्यंत कारवाई करण्यात आली आहे.


महाविकास आघाडीच्या निशाण्यावर कोणते नेते?


प्रवीण दरेकर, किरीट सोमय्या, प्रसाद लाड ,राणे कुटुंबीय, देवेंद्र फडणवीस , आशिष शेलार, गिरीश महाजन ,सुरेश धस ,गोपीचंद पडळकर या भाजपचा नेत्यांवर महाविकास आघाडीचा, कारवाईचा बडगा असणार आहे अशी माहिती मिळते.


संबंधित बातमी :