एक्स्प्लोर

भारतीय भाषणात पुढे मात्र क्रीडाप्रकारात मागे, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची खंत

भारतीय क्रिडाप्रकारात मागे, असल्याची खंत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी व्यक्त केली आहे. सोलापूर विद्यापीठात आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

मुंबई : भारत 130 कोटींचा देश आहे. मात्र क्रीडाप्रकारात मागे असून फक्त भाषणबाजीत पुढे असल्याची खंत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी व्यक्त केली. ते सोलापुरात बोलत होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात 23 व्या आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धांचे आयोजन राज्यपालांचे हस्ते करण्यात आलं. यावेळ राज्यातील जवळपास 20 विद्यापीठातील 3 हजार विद्यार्थी विविध स्पर्धांसाठी सोलापूर विद्यापीठात दाखल झाले आहेत. पुढील तीन दिवस या स्पर्धांचे आयोजन सोलापूर वि्द्यापीठात करण्यात आले आहे. यावेळी बोलताना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्रासह भारताच्या खेळातल्या कामगिरी बाबत खंत व्यक्त केली. 1952 नंतर देशाने बोटावर मोजण्याइतकेच पदकं मिळवले. त्यातही महाराष्ट्राची कामगिरी अंत्यत सुमार असल्याचे विधान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केले. तर राज्याला अशा क्रिडास्पर्धातून चांगले खेळाडू निर्माण होतील, असा विश्वास कोश्यारी यांनी व्यक्त केला. संस्कृतवरुन स्तुती तर मराठीवरुन चिमटे - क्रीडा स्पर्धेच्या कार्यक्रमात सुत्रसंचालन संस्कृतमधून करण्यात आले. यावरुन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी कुलगुरुंचे कौतुक केले. संस्कृत भाषा लोप पावत चालली आहे. अशात संस्कृतमधून सुत्रसंचालन केल्याचे समाधान कोश्यारी यांनी व्यक्त केलं. तर उपस्थित पाहुण्यापैकी कोणीच मराठीत भाषण केलं नाही यावरुन राज्यपालांनी कानपिचक्या ही काढल्या. मी उत्तराखंडमधून आल्यानंतर मराठीत शपथ घेतली. ज्याची चर्चा सर्व माध्यमातून झाली. मात्र, यात विशेष काही नाही, महाराष्ट्रात असाल तर मराठी शिकणे गरजेचे आहे. मात्र, या कार्यक्रमात कोणीच मराठीत भाषण केलं नाही. कुलगुरुंनी ही इंग्रजीत भाषण केलं. किमाण आभार तरी मराठीत मानावे असे म्हणत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी चिमटे काढले. स्पर्धेसाठी विद्यापीठ सज्ज - या आयोजनासाठी विद्यापीठाने 15 मैदाने तयार करुन घेतली आहेत. या आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धेसाठी राज्यातील 20 विद्यापीठांचे जवळपास 3 हजार विद्यार्थी व संघ व्यवस्थापक उपस्थित राहणार आहेत. क्रीडा स्पर्धांसंदर्भात जागृती निर्माण करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात क्रीडा ज्योतीचे आयोजन केले आहे. या स्पर्धेचा समारोप 30 डिसेंबरला जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या हस्ते व कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील क्रीडाप्रेमींसाठी हा महोत्सव म्हणजे पर्वणी आहे. क्रीडाप्रेमींनी याचा आनंद घ्यावा, असे आवाहन विदयापीठाच्या वतीने कुलसचिव डॉ. विकास घुटे आणि क्रीडा संचालक डॉ. एस.के. पवार यांनी केले आहे. हेही वाचा - भूमीपुत्रांना नोकरीत आरक्षण मिळणार; राज्यपालांचे आश्वासन Solapur University | आमदारांच्या नातेवाईकांचे गुण वाढवल्याचा सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरुंवर आरोप | ABP Majha

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जुलै 2026 | सोमवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जुलै 2026 | सोमवार
Nashik Crime News: पतीनं पत्नी अन् चिमुकल्याला निर्दयीपणे संपवलं; स्वतःही घेतलं विष, रूग्णालयात मृत्यूशी झुंज, नाशिकमधील हादरवणारी घटना
पतीनं पत्नी अन् चिमुकल्याला निर्दयीपणे संपवलं; स्वतःही घेतलं विष, रूग्णालयात मृत्यूशी झुंज, नाशिकमधील हादरवणारी घटना
Rohini Khadse: अरे मोदीजींच्या चमच्या, देशाची वाट लावायला देश काय तुमच्या बापाची जाहगीर वाटली काय?; भाजपच्या अतुल भातखळकरांच्या टीकेला रोहिणी खडसेंच तिखट प्रत्युत्तर
अरे मोदीजींच्या चमच्या, देशाची वाट लावायला देश काय तुमच्या बापाची जाहगीर वाटली काय?; भाजपच्या अतुल भातखळकरांच्या टीकेला रोहिणी खडसेंच तिखट प्रत्युत्तर
Samruddhi Mahamarg Accident : मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर

व्हिडीओ

Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report
J P Nadda Meeting With CJP : सरकार-आंदोलक पहिली बैठक, नड्डांकडे मागण्यांचं निवेदन | Special Report
NEET Result 2026 Pune Krushna Hundekari : नीट परिक्षेच्या निकालात गडबड; पुण्यातील विद्यार्थिनीचे आरोप
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
CJP Protest : विद्यार्थी सोडाच... तीन टर्म आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
विद्यार्थी सोडाच... तीन टर्म आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
Share Market : सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
Amit Shah : CJP च्या आंदोलनामुळं नवी दिल्लीत बैठकांचा धडाका, अमित शाहांची धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबत बैठक, इतर दोन मंत्र्यांची हजेरी 
अभिजित दिपकेच्या सीजेपीच्या आंदोलनाचा परिणाम, दिल्लीत बैठकांचा धडका, अमित शाहांच्या बैठकीत तीन मंत्र्यांची उपस्थिती  
Delhi Jantar Mantar Protest: 'दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांना केसांना धरुन खेचलं, लाठीमारात 40-50 विद्यार्थ्यांची डोकी फोडली', सीजेपीचा गंभीर आरोप
'दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांना केसांना धरुन खेचलं, लाठीमारात 40-50 विद्यार्थ्यांची डोकी फोडली', सीजेपीचा गंभीर आरोप
Yogendra Yadav : संसदेकडे जाणारे सर्व रस्ते गर्दीने भरुन गेलेत, लाखोंचा जमाव पाहून योगेंद्र यादव भारावले, म्हणाले, 'हा ऐतिहासिक क्षण...'
50 वर्षांनंतर शिक्षण आणि बेरोजगारीच्या मुद्यावर युवक रस्त्यावर उतरले, योगेंद्र यादव व्हिडिओ शेअर करत म्हणाले...
जंतरमंतरवरील आंदोलकांना करंट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप; अनेकांना भर आंदोलनात करंटचे झटक्यावर झटके, पोलिसांनी आरोपाचं उत्तर सुद्धा दिलं नाही
जंतरमंतरवरील आंदोलकांना करंट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप; अनेकांना भर आंदोलनात करंटचे झटक्यावर झटके, पोलिसांनी आरोपाचं उत्तर सुद्धा दिलं नाही
Samruddhi Mahamarg Accident : मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
Embed widget