Independence Day 2022 : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव! महाराष्ट्र पोलिसांचे 9 जवान सायकलं गाठणार दिल्ली, 12 दिवसांत पूर्ण करणार प्रवास
Independence Day 2022 : महाराष्ट्र पोलिसांचे 9 जवान सायकलवरून दिल्लीला रवाना झाले आहेत. 15 ऑगस्टपर्यंत ते राजधानी दिल्लीत पोहोचतील आणि कार्यक्रमात सहभागी होतील.
Independence Day 2022 : येत्या 15 ऑगस्टला देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ( (Azadi ka Amrit Mahotsav) साजरा होणार आहे. त्यासाठी सर्वत्र जोरदार तयारी सुरू आहे. यावेळी महाराष्ट्र पोलिसांचे 9 जवान सायकलवरून दिल्लीला रवाना झाले आहेत. 15 ऑगस्टपर्यंत ते राजधानी दिल्लीत पोहोचतील आणि कार्यक्रमात सहभागी होतील.
महाराष्ट्र पोलिसांच्या 9 जवानांच्या सायकलला महाराष्ट्राचे डीजीपी रजनीश सेठ यांनी हिरवा झेंडा दाखवून त्यांच्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. या 9 जणांमध्ये प्रशांत बचाव, अतिरिक्त एसपी धुळे जिल्हा, धनंजय एरुळे, अतिरिक्त उपायुक्त एसआयडी, शरद पाटील, एपीआय गडचिरोली, दिलीप खोंडे, ASI, धुळे, अनिल जाधव, जितेंद्र परदेशी, हवालदार, प्रकाश माळी, धुळे, हवालदार, प्रकाश माळी, धुळे; शिवाजी हावळे, हवालदार, पुणे आणि मनोज भंडारी, शिपाई पुणे, यांचा समावेश आहे.
DGP रजनीश सेठ यांनी ABP माझाशी संवाद साधताना सांगितलं की, "12 दिवसांत हे जवान मुंबईहून दिल्लीला पोहोचतील, त्यासाठी ते महाराष्ट्र ते मध्य प्रदेश, तिथून उत्तर प्रदेश आणि नंतर दिल्लीला पोहोचतील. सेठ पुढे बोलताना म्हणाले की, आम्ही प्रत्येक राज्यातील पोलिसांच्या संपर्कात आहोत आणि त्यांना आमच्या जवानांना आवश्यक मदत देण्याची विनंती केली आहे. या 9 जणांसोबत एक मेडिकल हेल्प व्हॅन आणि सायकल रिपेअरर देखील आहे. जेणेकरून रस्त्याच्या मधोमध किंवा जंगलात कोणाची सायकल खराब झाली तर ती लगेच दुरुस्त करता येईल.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा अर्थ
भारत स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. त्याला 'आझादी का अमृत महोत्सव' असं नाव देण्यात आलं आहे. आझादी का अमृत महोत्सव हा भारत सरकारच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या लोकांचा, संस्कृतीचा आणि प्रगतीशील भारताच्या गौरवशाली इतिहासाचा गौरव करण्यासाठीचा एक उपक्रम आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :