Rain Alert: संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र ते मुसळधार पावसाचे अलर्ट, कुठे रेड कुठे ऑरेंज? IMD चा संपूर्ण हवामान अंदाज
आज मुंबई ठाण्यासह बहुतांश भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Maharashtra weather alert: राज्यात यंदा परतीचा पाऊस जोरदार हजेरी लावणार असल्याचा अंदाज IMD मी दिला आहे. पुढील दोन ते तीन दिवस तीव्र पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून आज राज्यातील काही जिल्ह्यांना रेड ऑरेंज व यलो अलर्ट देण्यात आले आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण मध्य महाराष्ट्रात आज पावसाचा जोर अधिक राहणार असून कोकण किनारपट्टीसह पुण्याला रेड अलर्ट तर मध्य महाराष्ट्रात काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित भागात मुसळधार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय. पुढील दोन दिवस कोकण मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक राहणार असून उर्वरित भागात येलो अलर्ट देण्यात आलेत.
आज मुंबई ठाण्यासह बहुतांश भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून पुण्यासह कोकणातील काही जिल्ह्यांना रेड अलर्ट तर मराठवाड्यात काही ठिकाणी ऑरेंज, यलो अलर्ट देण्यात आले आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कमी दाबाचा पट्टा सध्या बंगालच्या उपसागरावर सक्रीय आहे. त्यामुळे राज्यात अनेक जिल्ह्यात पावसाचे अलर्ट देण्यात आले आहेत. पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात येणार आहेत.
कोणत्या भागात काय अलर्ट?
(दि.25 सप्टेंबर)
रेड अलर्ट: पुणे, रत्नागिरी, रायगड
ऑरेंज अलर्ट: पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदूर्ग, नाशिक, अहमदनगर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड
यलो अलर्ट: धुळे, नंदुरबार, जळगाव, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव
पुढील दोन दिवस काय इशारा?
26 सप्टेंबर
रेड अलर्ट: पालघर , नाशिक
ऑरेंज अलर्ट: नंदुरबार, धुळे ,ठाणे, रायगड, पुणे ,कोल्हापूर
येलो अलर्ट: रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, अहमदनगर, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बीड,जालना, परभणी, हिंगोली, तर विदर्भातील अकोला, वाशिम, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली
27 सप्टेंबर
ऑरेंज अलर्ट: पालघर
येलो अलर्ट: ठाणे, पालघर, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ
मुंबईसह उपनगरात नागरिकांना सतर्कतेचं आवाहन
मुंबई शहर आणि मुंबई उपनगरातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि 30-40 किमी प्रतितास वेगाने वादळी वाऱ्यासह गडगडाटी वादळ होण्याची शक्यता आहे. पुढील 3-4 तासांत. घराबाहेर पडताना खबरदारी घेण्याचं आवाहन मुंबई हवामान विभागानं केलं आहे.
हेही वाचा: