एक्स्प्लोर
सरकारी जमिनीच्या बेकायदा हस्तांतरप्रकरणी धनंजय मुंडेंविरोधात गुन्हा दाखल
तीन दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर आज (शुक्रवारी) विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बीड : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर अखेर चौथ्या दिवशी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी जमिनीच्या बेकायदा हस्तांतरप्रकरणी आज (शुक्रवारी) सकाळी 7.30 वाजता बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने त्यासंबधीचे आदेश दिल्यानंतर पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे. खासगी मालकीच्या प्रस्तावित साखर कारखान्यासाठी जमीन हडपल्याप्रकरणी मुंडेंवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर आज अंबाजोगाई येथील बर्दापूर पोलीस ठाण्यात मुंडे यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका धनंजय मुंडेंनी सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे. त्यावर आज सुनावणी होणार आहे. मुंडे यंच्यासह एकूण 14 जणांवर आयपीसीच्या कलम 420, 468, 465, 464, 471 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंडे यामध्ये दहाव्या क्रमांकाचे आरोपी आहेत. औरंगाबाद खंडपीठाने निर्णय दिल्यानंतरही तब्बल चार दिवस धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला नव्हता. त्यामुळे तक्रारदार राजाभाऊ फड हे स्वतः रात्रभर बर्दापूर पोलीस ठाण्यात बसून होते. अखेर आज सकाळी 7.30 वाजता पोलिसांनी मुंडेंविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
पालघर
व्यापार-उद्योग























