एक्स्प्लोर

इंजिनिअरच व्हायला हवं होतं, धुळ्याच्या 'त्या' डॉक्टरची उद्विग्नता

मुंबई : रुग्ण दगावल्याच्या संतापातून रुग्णाच्या नातेवाईकांनी धुळ्यात डॉक्टरला मारहाण केल्यानंतर, डॉ. रोहन महामुनकर यांचा डोळा निकामी होण्याची भीती निर्माण झाली आहे. मारहाणीत जखमी झालेल्या 35 वर्षीय डॉक्टरने उद्विग्नतेतून आपण इंजिनिअरच व्हायला पाहिजे होतं, असे उद्गार काढले आहेत. 'मेडिकलऐवजी आपण इंजिनिअरिंगच घ्यायला पाहिजे होतं. मी दोन्ही कोर्सेससाठी पात्र ठरलो होतो.' असं डॉ. महामुनकर म्हणाले. धुळ्यात मारहाण झाल्यानंतर डॉक्टर मुंबईत परतले आहेत. डोळ्याच्या दुखापतीबाबत जेजे हॉस्पिटलचे डीन डॉ. तात्याराव लहाने यांची भेट ते घेणार आहेत. आपल्या आईने रुग्णालयांत क्लेरिकल काम केलं होतं. तिनेच इंजिनिअरिंग ऐवजी मेडिकल घेण्याचा आग्रह केला होता. मात्र रविवारच्या घटनेनंतर तिनेच सगळ्यात आधी दिलगिरी व्यक्त केली, असं डॉ. महामुनकर सांगतात. डॉ. महामुनकरांचं ब्रेन स्कॅनिंग केल्यानंतर डाव्या डोळ्यात फ्रॅक्चर झाल्याचं दिसत आहे. त्यामुळे ऑप्टिक नर्व्हवर परिणाम होऊन दृष्टी जाण्याची भीती असल्याचं डॉ. लहानेंनी सांगितलं. 'रविवारी रात्री काय झालं ते नेमकं आठवत नाही. अनेक जणांनी माझ्यावर हल्ला केला. माझे दोन मोबाईल घेऊन त्याचे तुकडे केले.' असं डॉ. महामुनकर सांगतात. के. जे. सोमय्या मेडिकल कॉलेजमधून पदवी घेतल्यानंतर ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात ऑर्थोपेडिक्स विषयातून डॉ. रोहन महामुनकरांनी डीएनबी पूर्ण केलं. त्यानंतर धुळ्यात वरिष्ठ निवासी डॉक्टर म्हणून ते रुजू झाले. ग्रामीण भागाचा अनुभव मला घ्यायचा होता, पण मी आणि माझ्या पालकांनी आयुष्यातला सर्वात वाईट अनुभव घेतला, असं ते म्हणतात. मूळ मुंबईतल्या कांदिवलीचे रहिवासी असलेल्या डॉ. महामुनकरांना धुळ्यापासून शक्य तितकं लांबच राहायचं आहे. काय आहे प्रकरण? धुळे शहरातील साक्री रोडवर तीन दिवसांपूर्वी झालेल्या दुचाकी अपघातात शत्रुघ्न शिवाजी लष्कर हा तरुण गंभीर जखमी झाल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यावेळी डॉ. महामुनकर यांनी या रुग्णाला न्यूरो सर्जनची आवश्यकता असल्याचे सांगितलं. मात्र रुग्णालयात न्यूरोसर्जन नसल्याने उपचाराअभावी शत्रुघ्नचा मृत्यू झाला आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला. या प्रकरणी 9 जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींना 15 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर संतप्त नातेवाईकांनी डॉ. महामुनकर यांना धक्काबुक्की करत मारहाण केली. यात डॉ. रोहन महामुनकर यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्यांचा डोळा निकामी होण्याची भीती व्यक्त होत आहे. आयएमएनेही या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. संशयिताचा गळफास धुळ्यातील डॉक्टर मारहाण प्रकरणातील संशयित आरोपीने पोलिस कोठडीतच गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रदीप सदाशिव वेताळ असं आत्महत्या करणाऱ्या आरोपीचं नाव आहे. धुळे शहर पोलिस स्टेशनच्या लॉकअपमध्ये असलेल्या बाथरुममध्ये प्रदीप वेताळने गळफास घेतला. पोलिस कोठडीतच आरोपीने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

संबंधित बातम्या :

धुळे डॉक्टर मारहाण : संशयित आरोपीचा पोलिस कोठडीत गळफास

धुळ्यात जबर मारहाणीत डॉक्टरचा डोळा निकामी होण्याची भीती

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
Mira Bhayandar News: रहिवासी इमारतींमध्ये कुर्बानीवर बंदी; सत्ताधारी भाजपने महासभेत प्रस्ताव केला मंजूर, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडासह गुन्ह्याची तरतूद
मीरा-भाईंदरमधील रहिवासी इमारतींमध्ये कुर्बानीवर बंदी; सत्ताधारी भाजपने महासभेत प्रस्ताव केला मंजूर, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडासह गुन्ह्याची तरतूद
Washim Crime Couple death: आंतरजातीय लग्नाला घरच्यांकडून विरोध, वाशिमच्या प्रेमी जोडप्याने मोर्णा तलावात एकत्रच उडी मारुन आयुष्य संपवलं
आंतरजातीय लग्नाला घरच्यांकडून विरोध, वाशिमच्या प्रेमी जोडप्याने मोर्णा तलावात एकत्रच उडी मारुन आयुष्य संपवलं
Sameer Wankhede on Tukaram Mundhe: बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
Sameer Wankhede on Tukaram Mundhe: बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
Ganesh Naik: डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
Baba Ramdev on Kangana Ranaut: शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
Pune Rent Homes: पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
Pune Crime News: टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
David Warner News : कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
Embed widget