एक्स्प्लोर

मी फक्त माझीच जन्मतारीख लक्षात ठेवते : सुप्रिया सुळे

उस्मानाबाद : मी फक्त माझीच जन्मतारीख लक्षात ठेवते, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गोपीनाथ मुंडेंच्या जन्मतारखेच्या वादावर सावध प्रतिक्रिया दिली आहे. तुळजाभवानीच्या दर्शनासाठी उस्मानाबादमध्ये आलेल्या सुप्रिया सुळे यांनी 'एबीपी माझा'शी एक्स्लुझिव्ह बातचीत केली. गोपीनाथ मुंडे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार या दोघांचाही वाढदिवस 12 डिसेंबरला असल्याचा सार्वत्रिक समज आहे. मात्र तपशील काढून पाहिल्यास मुंडेंनी जन्मतारीख बदलल्याचं समजेल, असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी ‘माझा कट्टा’वर केला होता. ही माहिती खुद्द गोपीनाथ मुंडेंचे पुतणे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी दिल्याचं अजित पवारांनी सांगितलं होतं. मात्र मी माझा कट्टा पाहिला नाही. त्यामुळे त्याविषयी बोलणार नाही. परंतु मी फक्त माझी जन्मतारीख लक्षात ठेवते, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. भाजपला पाठिंबा नाहीच शिवसेनेचे मंत्री राजीनामा 18 फेब्रुवारी रोजी राजीनामा देणार असल्याची चर्चा सुरु आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकार अस्थिर होईल. त्यामुळे सरकारला राष्ट्रवादी पाठिंबा देणार का याबाबत प्रश्न विचारला असता, सुप्रिया सुळेंनी आमचा भाजपला पाठिंबा नसल्याचं सांगितलं. शरद पवार दोन वर्षांपूर्वी पाठिंबा देण्याचं बोलले होते. त्यानंतर एकदाही बोलले नाहीत. आम्ही कोणाबरोबरही जाणार नसल्याचं पवार काही दिवसांपूर्वी बोलले होते, असंही सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं. फालतू विचार करण्यासाठी वेळ नाही सरकारच्या विरोधात कोणते मुद्दे असल्याचं तुम्हाला वाटतं, या प्रश्नावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "मी याबाबत फारसा विचार केलेला नाही. फालतू विचार करण्यासाठी माझ्याकडे वेळ नसतो. मी लोकांची सेवा करण्यात व्यस्त आहे." फडणवीस सरकारचा कारभार घाणेरडा अडीच वर्षातील फडणवीस सरकारचा सर्वात घाणेरडा कारभार असल्याचा हल्लाबोलही सुप्रिया सुळे यांनी केला. सत्ता स्थापनेपासूनच हे घाणेरडं सरकार आहे. महाराष्ट्राचा नंबर वन घसरला. सत्तेतील दोन पक्षात मोठं भांडण सुरु आहे. 25 वर्ष युतीमध्ये होते. 25 वर्षांनंतर दोनच वर्ष सत्तेत आले. सत्तेत सोबत असूनही भांडण एवढं टोकाला पोहोचलं आहे की, ते एकमेकांचं पाणी काढत आहेत. ही मराठी संस्कृती नाही. हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. पवारांना विरोध ही खेकडा प्रवृत्ती शरद पवारांना पद्मविभूषण हा महाराष्ट्राचा सन्मान आहे. पवारांनी हा पुरस्कार राज्यातील जनतेला, शेतकऱ्यांना अर्पण केला आहे. पण शरद पवारांना विरोध ही खेकडा प्रवृती आहे. महाराष्ट्रातील काही जणांना पवारांना विरोध करण्याची सवय आहे, असंही सुळे म्हणाल्या.

महत्त्वाच्या बातम्या

Dahihandi 2026: मुंबईत दहीहंडी उत्सवात मन हेलावणारी घटना; दोरी बांधलेला विटांचा कॉलम कोसळला, 7 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
मुंबईत दहीहंडी उत्सवात मन हेलावणारी घटना; दोरी बांधलेला विटांचा कॉलम कोसळला, 7 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
दोन दिवसांपूर्वी भेट घेतली, सविस्तर चर्चा केली, पण...; जरांगेंच्या आंदोलनाचा 8 वा दिवस, विखे पाटलांनी सांगितला तपशील
दोन दिवसांपूर्वी भेट घेतली, सविस्तर चर्चा केली, पण...; जरांगेंच्या आंदोलनाचा 8 वा दिवस, विखे पाटलांनी सांगितला तपशील
मंत्रालयात शिक्षणमंत्र्यांच्या अधिकाराला कात्री, अवर सचिव स्तरावरच निर्णय; मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया
मंत्रालयात शिक्षणमंत्र्यांच्या अधिकाराला कात्री, अवर सचिव स्तरावरच निर्णय; मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया
Dahihandi Live Updates : महाराष्ट्रात यंदाचे पहिले नऊ थर ठाण्यात; मुंबईसह राज्यात आज दहीहंडीचा थरथराट, गोविंदांसाठी लाखोंंची बक्षिसं
Dahihandi Live Updates Maharashtra : महाराष्ट्रात यंदाचे पहिले नऊ थर ठाण्यात; मुंबईसह राज्यात आज दहीहंडीचा थरथराट, गोविंदांसाठी लाखोंंची बक्षिसं

व्हिडीओ

Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO
Dahihandi 2026 Jai Jawan: 1..2..3..4..5..6..7..8..9..10..11...; जय जवानच्या संदीप ढवळेंची मोठी घोषणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nepal : नेपाळमधील भीषण महाप्रलयाच्या 11 दिवसानंतर चमत्कार, ढिगाऱ्यातून महिलेला जिवंत बाहेर काढलं-VIDEO
नेपाळमधील भीषण महाप्रलयाच्या 11 दिवसानंतर चमत्कार, ढिगाऱ्यातून महिलेला जिवंत बाहेर काढलं
Sonam Wangchuk: 'तर सर्वात मोठं आंदोलन होईल', सोनम वांगचुक यांनी आता नेमकी कोणती मागणी केली?
'तर सर्वात मोठं आंदोलन होईल', सोनम वांगचुक यांनी आता नेमकी कोणती मागणी केली?
Dahihandi 2026: मुंबईत दहीहंडी उत्सवात मन हेलावणारी घटना; दोरी बांधलेला विटांचा कॉलम कोसळला, 7 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
मुंबईत दहीहंडी उत्सवात मन हेलावणारी घटना; दोरी बांधलेला विटांचा कॉलम कोसळला, 7 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
Gold Chain Lost: केंद्रीय मंत्र्यांच्या गळ्यात हार घालायला गेला अन् गळ्यातली सोनसाखळी गमावून बसला; नेत्याला गर्दीचा फटका
केंद्रीय मंत्र्यांच्या गळ्यात हार घालायला गेला अन् गळ्यातली सोनसाखळी गमावून बसला; नेत्याला गर्दीचा फटका
कर्जाच्या परतफेडीवरून महिलेचे अपहरण करून मारहाण, घरी बोलावून ओलीस ठेवलं, नग्न करून व्हिडिओ सुद्धा चित्रित; भयंकर कटात दोन महिला सुद्धा सामील
कर्जाच्या परतफेडीवरून महिलेचे अपहरण करून मारहाण, घरी बोलावून ओलीस ठेवलं, नग्न करून व्हिडिओ सुद्धा चित्रित; भयंकर कटात दोन महिला सुद्धा सामील
Swatantra Bhardwaj : निशू आझादच्या वडिलांना मारहाण, स्वतंत्र भारद्वाजला अटक, कोर्टानं पोलीस कोठडीत पाठवलं...   
निशू आझादच्या वडिलांना मारहाण, दिल्ली पोलिसांकडून स्वतंत्र भारद्वाजला अटक, कोर्टाचा मोठा निर्णय
सोलापुरात मराठा आंदोलक आक्रमक; गोपीचंद पडळकरांचा ताफा अडवला, आमदार म्हणाले, माझा पाठिंबा पण...
सोलापुरात मराठा आंदोलक आक्रमक; गोपीचंद पडळकरांचा ताफा अडवला, आमदार म्हणाले, माझा पाठिंबा पण...
Vidyanand Bapat : विद्यानंद बापटांना एआयच्या माध्यमातून डीजेच्या तालावर नाचवलं; व्हिडीओ व्हायरल, प्रतिक्रिया देताना मोदींच्या एका व्हिडीओचा संदर्भ दिला अन् म्हणाले...
विद्यानंद बापटांना एआयच्या माध्यमातून डीजेच्या तालावर नाचवलं; व्हिडीओ व्हायरल, प्रतिक्रिया देताना मोदींच्या एका व्हिडीओचा संदर्भ दिला अन् म्हणाले...
Embed widget