एक्स्प्लोर

Dhule News Update : पतीकडून पत्नीचा निर्घृण खून, दगडाने ठेचून केली हत्त्या, धुळे जिल्ह्यातील घटनेने खळबळ

Dhule News Update : धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात पतीने पत्नीचा खून केला आहे. दिलीप हिराजी सोनवणे ( वय 48 )  असे संशयीत आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला त्याब्यात घेतले आहे.

Dhule News Update : चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा दगडाने ठेचून खून केला आहे. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील डांगरशिरवाडे येथे ही घटना घडली आहे. दिलीप हिराजी सोनवणे ( वय 48 )  असे संशयीत आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला त्याब्यात घेतले आहे. 

डांगरशिरवाडे येथे दिलीप सोनवणे हा पत्नी मंडाबाई सोनवणे आणि मुला-मुलींसह राहत होता. तो पत्नी मंडाबाई यांच्या चारित्र्यावर नेहमी  संशय घेत होता. त्यावरून त्यांच्यामध्ये सतत वाद होत असत. त्यांच्यातील ही भांडणे नित्याची झाली होती. दिलीप याने गावातीलच एक शेत कसायला घेतले आहे. बुधवारी रात्री तो पत्नी मंडाबाईला घेऊन पिकांना पाणी देण्यासाठी गेला होता. त्यावेळी शेतातच त्यांच्यात वाद सुरू झाला. यामुळे संतप्त झालेल्या दिलीप याने शेताच्या बांधावर पत्नी मंडाबाईच्या डोक्यावर तसेच तोंडावर दगडाने मारहाण केली. या घटनेत पत्नी मंडाबाईचा जागीच मृत्यू झाला. 

 या घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्यानंतर पोलिसांनी मृत मंडाबाई यांचा मृतदेह दुपारी उशिरा पिंपळनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला.

याप्रकरणी पिंटू काळू गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, हिराजी सोनवणे याच्याविरुद्ध पिंपळनेर पोलीस ठाण्यात पत्नीचा खून केल्याच्या संशयावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलीप सोनवणे याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी दुपारी उशिरापर्यंत त्याच्या अटकेची कारवाई सुरू होती. दरम्या, या घटनेने साक्री तालुक्यासह संपूर्ण धुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. पिंपळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. 

महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

प्रिंटिंगचा शोध जेवढा मोठा तितकाच AI तंत्रज्ञानाचा शोधही मोठा, पण त्याचे दुष्परिणाम होणार : राजीव खांडेकर 
प्रिंटिंगचा शोध जेवढा मोठा तितकाच AI तंत्रज्ञानाचा शोधही मोठा, पण त्याचे दुष्परिणाम होणार : राजीव खांडेकर 
शेतात पाईपलाईनचे काम सुरु असताना मोठी दुर्घटना, कराडमध्ये मातीच्या ढिगार्‍याखाली सापडून दोन मजुरांचा मृत्यू
शेतात पाईपलाईनचे काम सुरु असताना मोठी दुर्घटना, कराडमध्ये मातीच्या ढिगार्‍याखाली सापडून दोन मजुरांचा मृत्यू
मिस्टर प्रफुल पटेलजी, रोहित पवारांनी थेट नाव घेऊनच दिलं चॅलेंज; VSR कंपनीच्या मालकाच्या मुलाचं लग्नच काढलं
मिस्टर प्रफुल पटेलजी, रोहित पवारांनी थेट नाव घेऊनच दिलं चॅलेंज; VSR कंपनीच्या मालकाच्या मुलाचं लग्नच काढलं
दुबईमध्ये अडकलेल्या मराठी पर्यटकांना IPF MahaHelpline ची मदत; 500 जण सुखरुप मायदेशी
दुबईमध्ये अडकलेल्या मराठी पर्यटकांना IPF MahaHelpline ची मदत; 500 जण सुखरुप मायदेशी

व्हिडीओ

AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
Dhananjay Mahadik on Gokul: 'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
Embed widget