एक्स्प्लोर
पत्नीची हत्या करुन फटाके फोडले, चार मुलांना मृतदेहाजवळ झोपवलं
नागपूर : नागपुरात एका क्रूर पित्याने चार चिमुकल्यांच्या समोर त्यांच्या आईची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. चारही मुलांना जीवे मारण्याची भीती दाखवत हत्येला आत्महत्येचा प्रकार दाखवण्याचा पित्याचा डाव चारही चिमुकल्यानी हाणून पाडला.
शब्बीरनं पत्नी शाहीना अंजुमची गळा दाबून हत्या केली. पत्नीची हत्या करुनही आरोपी शब्बीरमधला सैतान शांत झाला नाही. हत्येनंतर त्यांनी घराबाहेर जाऊन फटाके वाजवले. इतकंच नाही, तर चारही मुलांना आईच्या मृतदेहाजवळ झोपण्यास भाग पाडलं.
राऊतनगर भागात राहणाऱ्या आरोपीला नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. चारही मुलं अजून त्या धक्क्यातून सावरलेली नाहीत. झाल्या प्रकाराबद्दल मुलांनी तोंड उघडू नये म्हणून, शब्बीरनं त्यांनाही जीवे मारण्याची धमकी दिली. मात्र मुलांनी घडला प्रकार सांगितल्यावर पोलिसांनी शब्बीरला बेड्या ठोकल्या.
मुलांची साक्ष ग्राह्य धरुन पोलिसांनी आरोपी शब्बीर शेखला अटक केली. शाहीना यांचे पोस्टमार्टम केल्यानंतर वैद्यकीय तपासणीत मुले खरं बोलत असल्याचे सिद्ध झाले. वडिलांच्या दारुच्या व्यसनामुळे या मुलांना आई गमवावी लागली आहे. खरं तर एक संपूर्ण कुटुंब उद्धवस्त झालं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement