एक्स्प्लोर

माझा मित्र येतोय, फडणवीसांच्या सूचनेनंतर साक्षात राणेच हजर!

अहमदाबाद : काँग्रेसचे दिग्गज नेते नारायण राणेंनी भाजप प्रवेशाच्या शक्यता धुडकावून लावल्या असल्या, तरी अहमदाबादमध्ये अमित शाह- देवेंद्र फडणवीस- नारायण राणे या त्रयीची भेट घडल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. अहमदाबादमधील तिघांच्या भेटीचा घटनाक्रमच सूत्रांनी उलगडून सांगितला आहे. त्यानुसार 'माझा मित्र येतोय' असं फडणवीसांनी सुरक्षा अधिकाऱ्यांना सांगितल्यानंतर साक्षात राणेच समोर उभे ठाकल्याची माहिती आहे. महाराष्ट्रात एक मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नारायण राणे भाजप प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. नारायण राणे यांनी अहमदाबादेत भाजपाध्यक्ष अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचं वृत्त धुडकावून लावत दृश्यांनाच आव्हान दिलं आहे. मात्र उच्चपदस्थ सूत्रांच्या माहितीनुसार अहमदाबादेतील शाहांच्या निवासस्थानी राणे पितापुत्र आणि फडणवीसांची तासभर चर्चा रंगली. अमित शाह यांचा एकुलता एक मुलगा जय यांची पत्नी ऋषिता यांनी नुकताच एका मुलीला जन्म दिला आहे. आजोबा झालेले अमित शाह नातीला पाहण्यासाठी परवा अहमदाबादला आले होते. त्यातच मुख्यमंत्र्यांचा अहमदाबाद दौरा ठरला. फडणवीसांना आपला दौरा गुप्त ठेवला होता. म्हणजेच गुजरात सरकारला याबाबत कोणतीही औपचारिक माहिती देण्यात आली नव्हती. प्रोटोकॉल विभागाला या दौऱ्याची कोणतीही माहिती नसताना गुप्तचर विभागाला फडणवीसांच्या दौऱ्याची वार्ता हाती लागली. त्यानंतर तातडीने सुरक्षा व्यवस्था आणि गाड्यांच्या ताफ्याची व्यवस्था करण्यात आली. सामान्यपणे गुजरातच्या मुख्यमंत्र्यांसाठी वापरला जाणारा ताफाच मुख्यमंत्र्यांना देण्यात आला. फडणवीस विमानतळावरुन थेट शाहांच्या निवासस्थानी जाणार होते. शाहा अहमदाबाद शहरातील थलतेज परिसरातल्या रॉयल क्रिसेंट सोसायटीमध्ये राहतात. मात्र विमानतळावरुन निघाल्यानंतर त्यांनी सुरक्षा अधिकाऱ्यांना सर्किट हाऊस एनेक्सीकडे गाडी वळवण्यास सांगितलं. हे सर्किट हाऊस म्हणजे राज्याचं अतिथीगृह आहे. फडणवीसांनी अचानक कार्यक्रमात बदल केल्याने सुरक्षा अधिकारीही चक्रावून गेले. मात्र माझा एक मित्र येणार आहे, त्याच्यासोबत मी येईन, असं फडणवीसांनी सांगितलं. थोड्याच वेळात देवेंद्र फडणवीसांचा मित्र सर्किट हाऊसला हजर झाला. मात्र हा मित्र दुसरं-तिसरं कुणी नसून साक्षात नारायण राणे होते. राणेंसोबत आमदार नितेश राणेही होते. फडणवीसांसोबत नारायण राणे स्कॉर्पिओत बसले. ही स्कॉर्पिओ गुजरात सरकारकडून देण्यात आली होती. मधल्या सीटवर नारायण राणे आणि मुख्यमंत्री विराजमान झाले. ड्रायव्हरच्या बाजूला नितेश राणे बसले. फडणवीस, राणे आणि नितेश हे अमित शाहांच्या घरी दाखल झाले. राणे आणि शाह यांची भेट गुप्त राखण्याचे कसोशीने प्रयत्न सुरु होते. मात्र गाड्यांचा ताफा दिसताच मीडियाचे कॅमेरे वळले. मुख्यमंत्री गाडीतून उतरले आणि कॅमेऱ्यांमध्ये ते कैद झाले. नारायण राणे आणि नितेश राणे मात्र गाडीतच बसून राहिले. गाडी थोडे पुढे अंधाराच्या दिशेने उभी करण्यात आली. तिथून गुपचूपपणे राणे पितापुत्र शाहांच्या घरी आले. रात्री दहाच्या सुमारास भेटीगाठी सुरु झाल्या. जवळपास तासभर ही चर्चा चालली. त्यानंतर फडणवीस विमानतळाकडे रवाना झाले. चार्टर्ड विमानाने ते मुंबईला परतले. मीडियाचे कॅमेरे गेल्यानंतर राणे पितापुत्रांनी काढता पाय घेतला. त्यानंतर दोघं हॉटेल हयात रिजन्सीला रवाना झाले. अहमदाबाद शहरातील आश्रम रोड परिसरातल्या या हॉटेलात राणेंनी संध्याकाळी चेक इन केलं होतं. राणे गोव्याहून थेट अहमदाबादला आले होते. गुप्त बैठकींचं सत्र संपल्यानंतर सकाळी पावणेसातच्या विमानाने राणे पितापुत्र मुंबईत दाखल झाले. मुंबई विमानतळावर राणेंना पत्रकारांनी गाठलं आणि प्रश्नांची सरबत्ती केली. त्यावेळी मी वैयक्तिक कामासाठी अहमदाबादला जाऊ शकत नाही का, असा सवाल त्यांनी विचारला. राणे गेल्यानंतर दोन तासांनी अमित शाह अहमदाबादहून निघाले. सुत्रांच्या माहितीनुसार ही बैठक दिल्लीतच होणार होती. मात्र नातीला पाहण्यासाठी शाह अहमदाबादला निघाले. त्यामुळे दिल्लीतल्या 11 अकबर रोड या सरकारी निवासस्थानी होऊ शकणारी बैठक शाहांच्या घरी झाली. फडणवीस शाहांना शुभेच्छा देण्यासाठीच अहमदाबादला गेल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे गुपचूप आलेले राणे, प्रोटॉकोल चुकवून अहमदाबादला गेलेले फडणवीस आणि नातीला पाहण्यासाठी दाखल झालेले शाह अशा त्रयीची चर्चा अखेर झाली. भाजपकडून आपल्याला ऑफर आहेच, मात्र आपण त्याविषयी विचार केलेला नाही, असा दावा करणाऱ्या नारायण राणेंना पक्षात घेणं शाहांना का आवश्यक वाटतं? असा प्रश्न विचारला जातो. त्याचं कारण म्हणजे अमित शाहांना एका दगडात दोन पक्ष्यांना निशाणा करायचं आहे. एकीकडे काँग्रेस अधिक कमकुवत होईल, तर दुसरीकडे शिवसेनेसमोर भाजपचं पारडं जड होईल. कोणे एके काळी शिवसेनेत असलेल्या राणेंकडे सेनेला रोखठोक उत्तर देण्याची ताकद आहे. त्यामुळे राणेंना पक्षात घेतल्यास 'चालबाज' अमित शाहांना राजकीय पटलावर पुढची खेळी खेळणं सोपं जाणार आहे.

संबंधित बातम्या :

भाजपची ऑफर जुनीच, अहमदाबादेत कोणालाही भेटलो नाही : राणे

...तर केंद्रीय मंत्री झालो असतो : नारायण राणे

पुढच्या सीटवर नितेश, मागच्या सीटवर राणे-मुख्यमंत्री!

LIVE UPDATE : अहमदाबादेत कोणालाही भेटलो नाही - राणे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray interview :…म्हणून राज ठाकरेंसोबत युती नाही!   उद्धव ठाकरेंची बेधडक मुलाखतPriyanka Gandhi SpeechKolhapur|बाळासाहेबांच्या मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला,कोल्हापुरातील आक्रमक भाषणDilip Walse Patil On Sharad Pawar : शरद पवारांचा मानसपुत्र असं मी नाही तर लोक म्हणातात-वळसेPriyanka Gandhi : बाळासाहेब ठाकरेंचा भर सभेत उल्लेख, प्रियंका गांधी यांचं मोदी, शाहांना आव्हान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
Priyanka Gandhi In Kolhapur : बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पीएम मोदींवर घणाघाती प्रहार
बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पीएम मोदींवर घणाघाती प्रहार
सिंगापूर, मलेशियासारखं पर्यटन सिंधुदुर्गात करायचंय; नारायण राणेंकडून विकासाचा मुद्दा, पण ठाकरेंवर टीका
सिंगापूर, मलेशियासारखं पर्यटन सिंधुदुर्गात करायचंय; नारायण राणेंकडून विकासाचा मुद्दा, पण ठाकरेंवर टीका
टपरीवर चहा, हॉटेलात पुरीभाजी, सलूनमध्ये कटींग; युगेंद्र पवारांचं बारामतीत 'मिशन विधानसभा'
टपरीवर चहा, हॉटेलात पुरीभाजी, सलूनमध्ये कटींग; युगेंद्र पवारांचं बारामतीत 'मिशन विधानसभा'
×
Embed widget