एक्स्प्लोर

कोरोनामुळे शेतकऱ्यांची स्थिती बिकट, पीक कर्जाची परतफेड शक्य नाही : शरद पवार

शरद पवार यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी ठाकरे सरकार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचं कौतुक केलं. तसेच नागरिकांना सरकारच्या सूचना पाळण्याचं आवाहन देखील केलं,

मुंबई : कोरोनामुळे बळीराजा खूप अडचणीत सापडला आहे. सध्या शेतकऱ्यांची स्थिती बिकट आहे. त्यामुळं त्यांना पीक कर्जाची परतफेड शक्य नाही. यासाठी सरकारने पीक कर्जाचे पुढील चार ते पाच वर्षासाठी हफ्ते पाडून द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केली आहे. आज शरद पवार यांनी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी कमेंटबॉक्समध्ये आलेल्या प्रश्नांची उत्तरं देखी दिली. यावेळी पवार म्हणाले की, शेतकऱ्यांच्या पीक कर्जाला 4-5 वर्षाचे हप्ते पाडून द्या. तसेच मोफत धान्य देताना शेतकऱ्यांकडे असलेला शेतमाल विकत घेण्याबाबत विचार करावा. शेतकरी अडचणीत सापडला आहे, शेतकऱ्यांच्या अर्थकारणाला यामुळे मोठा फटका बसला आहे, असं शरद पवार म्हणाले. Coronavirus | रेपो रेटमध्ये मोठी कपात, EMI तीन महिने स्थगित करण्याचा आरबीआयचा सल्ला ते म्हणाले की, कोरोनाचा मानवांसह पशूपक्ष्यांवरही परिणाम झाला आहे. सरकार याबाबत काही सूचना देत आहे. सरकारचं काम चांगल्या पद्धतीनं सुरु आहे. या सरकारच्या सूचनांकडे दुर्लक्ष कराल तर गंभीर परिणाम भोगावे लागतील, असंही शरद पवार म्हणाले. Coronavirus Full Updates | देशभरात कोरोनाचा गुणाकार सुरु, राज्यात 136 कोरोनाबाधित शरद पवार म्हणाले की, जेवढ्या कंपन्यात कामगार काम करतात, त्या कंपनी मालकांनी कामगारांना जपावं, त्यांच्या वेतनाची खबरदारी घ्यावी. कोरोनाशी लढण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार, खासदार एका महिन्याचे वेतन देणार असल्याचे देखील पवारांनी घोषित केले. सध्याच्या परिस्थितीत नागरिकांकडून शिस्तीची गरज आहे. मात्र पोलिसांनी देखील सामंजस्यानं वागावं, असं शरद पवार म्हणाले. कोरोनाचा सामना करण्याच्या दृष्टीने राज्य सरकार, केंद्र सरकार, राष्ट्रीय संघटना, आंतरराष्ट्रीय संघटना यांनी अनेक चांगले निर्णय तातडीने घेतले आहेत. कोरोनाचं संकट अत्यंत गंभीर आहे हे प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवं, देशातील अर्थव्यवस्थेवर याचा गंभीर आणि दीर्घकालीन परिणाम होणार आहे यात काहीही शंका नाही असंही शरद पवार यांनी म्हटलं. पवार म्हणाले की, अत्यावश्यक सेवेच्या वाहनांना अडवू नका. संकटातून जनतेला बाहेर काढण्यासाठी सर्व शक्ती वापरा असंही पवार म्हणाले. द्राक्षं आणि आंबा उत्पादकांना सरकारने मदत करावी असंही आवाहन शरद पवार यांनी केलं आहे. ईएमआयबाबत सरकारने विचार करावा, फळबागांच्या नुकसानीकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे, असंही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

Jalna Crime News: बस अडवून तरुणीला जबरदस्ती उतरवण्याचा प्रयत्न; जाब विचारताच चालकाला तरुणाकडून बेदम मारहाण, जालन्यातील संतापजनक घटना
बस अडवून तरुणीला जबरदस्ती उतरवण्याचा प्रयत्न; जाब विचारताच चालकाला तरुणाकडून बेदम मारहाण, जालन्यातील संतापजनक घटना
Maharashtra Live News Updates: 64 तासांनंतरही मोशी दुर्घटनेचं शोधकार्य सुरू, अत्याधुनिक कटरद्वारे पाडकाम
Maharashtra Live News Updates: 64 तासांनंतरही मोशी दुर्घटनेचं शोधकार्य सुरू, अत्याधुनिक कटरद्वारे पाडकाम
Monsoon Update : भरमसाठ कोसळल्यानंतर राज्यावर मान्सून पुन्हा रुसला, अरबी समुद्र अन् उत्तर भारतात कमी दाबाचा पट्टा; ढगांची दाटी विरळ, राज्यावर पुन्हा नवं संकट? वाचा सविस्तर
भरमसाठ कोसळल्यानंतर राज्यावर मान्सून पुन्हा रुसला, अरबी समुद्र अन् उत्तर भारतात कमी दाबाचा पट्टा; ढगांची दाटी विरळ, राज्यावर पुन्हा नवं संकट? वाचा सविस्तर
Supriya Sule: 'आम्हाला फक्त मनसेमध्ये पाठवायचं बाकी राहिलंय'; पक्षांतराच्या चर्चांवर सुप्रिया सुळेंचा खोचक टोला, म्हणाल्या, 'आता राष्ट्रवादीचे खासदार...'
'आम्हाला फक्त मनसेमध्ये पाठवायचं बाकी राहिलंय'; पक्षांतराच्या चर्चांवर सुप्रिया सुळेंचा खोचक टोला, म्हणाल्या, 'आता राष्ट्रवादीचे खासदार...'

व्हिडीओ

Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Moshi Building Collapse: अवघ्या दीड वर्षांचा संसार मोडून पडला; आई-वडिलांचा आधार हरपला, मोशी कचरा डेपो दुर्घटनेत बळी गेलेल्या भावेशच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
अवघ्या दीड वर्षांचा संसार मोडून पडला; आई-वडिलांचा आधार हरपला, मोशी कचरा डेपो दुर्घटनेत बळी गेलेल्या भावेशच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
Jalna Crime News: बस अडवून तरुणीला जबरदस्ती उतरवण्याचा प्रयत्न; जाब विचारताच चालकाला तरुणाकडून बेदम मारहाण, जालन्यातील संतापजनक घटना
बस अडवून तरुणीला जबरदस्ती उतरवण्याचा प्रयत्न; जाब विचारताच चालकाला तरुणाकडून बेदम मारहाण, जालन्यातील संतापजनक घटना
नोव्हाक जोकोविचचे 25व्यांदा ग्रँडस्लॅम जिंकण्याचं स्वप्न भंगलं; सेमीफायनलमध्ये 15 वर्षांनी लहान असणाऱ्या सिनरने बाजी मारली
नोव्हाक जोकोविचचे 25व्यांदा ग्रँडस्लॅम जिंकण्याचं स्वप्न भंगलं; सेमीफायनलमध्ये 15 वर्षांनी लहान असणाऱ्या सिनरने बाजी मारली
Panvel Crime News : ग्राहक बनून हॉटेलमध्ये गेले; व्यवहार ठरवला पैसे अन्...; पनवेलमधील नामांकित हॉटेलमध्ये हाय-प्रोफाइल देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश; 6 महिलांची सुटका
ग्राहक बनून हॉटेलमध्ये गेले; व्यवहार ठरवला पैसे अन्...; पनवेलमधील नामांकित हॉटेलमध्ये हाय-प्रोफाइल देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश; 6 महिलांची सुटका
उत्तर प्रदेशात नॅशनल हायवेच्या संरक्षक भिंतीला महिन्यात भगदाड; तीन दिवसांत 15 जणांचा मृत्यू, उत्तराखंड आणि हिमाचलमध्ये 438 रस्ते बंद, मिझोरममध्ये पर्यटक 7 दिवसांपासून अडकले
उत्तर प्रदेशात नॅशनल हायवेच्या संरक्षक भिंतीला महिन्यात भगदाड; तीन दिवसांत 15 जणांचा मृत्यू, उत्तराखंड आणि हिमाचलमध्ये 438 रस्ते बंद, मिझोरममध्ये पर्यटक 7 दिवसांपासून अडकले
अल्पवयीन मुलीवर अत्याचार, जामीनावर बाहेर येताच बायको चार वर्षाची मुलगी अन् 18 महिन्यांच्या दोन चिमुरड्यांना संपवलं, नंतर पुढे सहा किमी जात पीडिता आणि तिच्या कुटुंबाला सुद्धा संपवलं
अल्पवयीन मुलीवर अत्याचार, जामीनावर बाहेर येताच बायको चार वर्षाची मुलगी अन् 18 महिन्यांच्या दोन चिमुरड्यांना संपवलं, नंतर पुढे सहा किमी जात पीडिता आणि तिच्या कुटुंबाला सुद्धा संपवलं
Sanjay Raut: उद्धव ठाकरे सीएम फडणवीस अन् आरएसएसच्या बालेकिल्ल्यात एल्गार करणार; संजय राऊतांनी नागपुरातील रामरक्षा आंदोलनाची तारीख सांगितली
उद्धव ठाकरे सीएम फडणवीस अन् आरएसएसच्या बालेकिल्ल्यात एल्गार करणार; संजय राऊतांनी नागपुरातील रामरक्षा आंदोलनाची तारीख सांगितली
Satara Crime News: दारूच्या नशेत घरात डोकावल्याचा संशय; पर्यटकाला चिखलात तुडवून संपवलं, साताऱ्यातील धक्कादायक घटना
दारूच्या नशेत घरात डोकावल्याचा संशय; पर्यटकाला चिखलात तुडवून संपवलं, साताऱ्यातील धक्कादायक घटना
Embed widget