एक्स्प्लोर

Hingoli Crime: नवरा-बायकोमध्ये सारखी भांडणं, 'पत्नीला नांदायला का पाठवत नाही?' विचारल्यावर सासरा अन् मेव्हण्यानं दगडाने ठेचून जावयाला संपवलं; हिंगोली हादरलं

Hingoli Crime : हिंगोली तालुक्यातील भटसावंगी येथे पत्नीला नांदविण्यास का पाठवत नाही, या कारणावरून झालेल्या वादातून जावयाची दगडाने हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली.

Hingoli Crime : हिंगोली (Hingoli) तालुक्यातील भटसावंगी येथे पत्नीला नांदविण्यास का पाठवत नाही, या कारणावरून झालेल्या वादातून जावयाची दगडाने हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी बासंबा पोलिसांनी सासरा आणि मेव्हण्यावर गुन्हा नोंदवत दोघांना यवतमाळ जिल्ह्यातून अटक केली. हरिदास सिताराम चौरे (वय 33, रा. भटसावंगी), असे मृत जावयाचे नाव आहे. तर साहेबराव कपाटे (सासरा) व गोलू उर्फ शत्रुघ्न कपाटे (मेव्हणा), अशी आरोपींचे नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, हरिदास चौरे याचा विवाह वर्षा कपाटे हिच्याशी सात वर्षांपूर्वी झाला होता. पती-पत्नीतील किरकोळ वादामुळे वर्षा काही दिवसांपासून माहेरी राहत होती. या संदर्भात चर्चा करण्यासाठी 19 नोव्हेंबर रोजी हरिदास आपल्या घरासमोर उभा असताना त्याचे सासरे आणि मेव्हणे त्याला भेटले. पत्नीला नांदविण्याबाबत हरिदासने विचारणा केली असता शाब्दिक वाद सुरू झाला. वाद चिघळताच हाणामारी झाली आणि संतापलेल्या आरोपींनी दगड उचलून हरिदासच्या डोक्यात व चेहऱ्यावर वार केले. गंभीर जखमांमुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. घटना घडल्यानंतर दोघेही आरोपी पळून गेले.

Hingoli Crime: दोन तासात आरोपी जेरबंद

घटनेची माहिती मिळताच बासंबा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह हिंगोली येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी स्वतः घटनास्थळी भेट देत तपासाला गती देण्याचे आदेश दिले. सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास आडे यांच्या पथकाने तपास सुरू करून फक्त दोन तासांत आरोपींचा यवतमाळ जिल्ह्यात शोध लावला आणि त्यांना ताब्यात घेतले. दत्ता चवरे यांच्या फिर्यादीवरून दोघांवर खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शवविच्छेदनानंतर हरिदासच्या पार्थिवाचा अंत्यविधी करण्यात आला.

Pune Crime: पुण्यात चुलत भावानेच भावाला संपवले

दरम्यान, पुणे शहरातील कात्रज-गुजरवाडी परिसरात चुलत भावाकडूनच तरुणाची हत्या करून मृतदेह पोत्यात बांधून फेकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अजय पंडित, असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर अशोक पंडित , असे आरोपीचे नाव आहे. दोघेही झारखंडचे रहिवासी असून काही वर्षांपासून पुण्यात वास्तव्यास होते. आरोपी अशोक पंडितला पुणे पोलिसांनी पिंपरी चिंचवड येथून अटक केली आहे. गुजर निंबाळकरवाडी येथे रस्त्याकाठी संशयास्पद पोते आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवून तपास सुरू केला असता मयत तरुणाचे नाव अजय पंडित असल्याचे समोर आले होते. अशोक पंडित याने भावाची हत्या करत मृतदेह पोत्यात भरून भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये स्टेशनच्या हद्दीत असणाऱ्या गुजरवाडी येथे फेकून दिला होता.  

आणखी वाचा 

Girish Mahajan on Malegaon Jan Akrosh Morcha: आरोपीला कोर्टात आणल्याची अफवा पसरली अन् जमाव संतप्त, नागरिक थेट न्यायालयात शिरले अन्...; मालेगावात नेमकं काय घडलं? गिरीश महाजनांनी सगळं सांगितलं

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेतकरी मदतीचा प्रस्तावच दिला नाही म्हणत केंद्रानं 26/11 पर्यंतची आकडेवारी दिली, फडणवीस म्हणाले, ते जुनं उत्तर; रोहित पवार 27/11चं पत्र दाखवत म्हणाले, फडणवीस साहेब अजून किती खोटं बोलणार?
शेतकरी मदतीचा प्रस्तावच दिला नाही म्हणत केंद्रानं 26/11 पर्यंतची आकडेवारी दिली, फडणवीस म्हणाले, ते जुनं उत्तर; रोहित पवार 27/11चं पत्र दाखवत म्हणाले, फडणवीस साहेब अजून किती खोटं बोलणार?
Illegal Bike Taxi : बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालवणाऱ्या  रॅपीडो, उबेर  सारख्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करा, परिवहन मंत्र्यांचा आदेश
बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालवणाऱ्या  रॅपीडो, उबेर  सारख्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करा, परिवहन मंत्र्यांचा आदेश
संचार साथी अ‍ॅप मोबाईलमध्ये प्री-इन्स्टॉल नसणार; देशव्यापी फटकार बसताच केंद्र सरकारनं यू टर्न घेत नाद सोडला!
संचार साथी अ‍ॅप मोबाईलमध्ये प्री-इन्स्टॉल नसणार; देशव्यापी फटकार बसताच केंद्र सरकारनं यू टर्न घेत नाद सोडला!
मोठी बातमी! पुण्याच्या जमीन घोटाळ्यातील आरोपी शीतल तेजवानीला अटक; 300 कोटींच्या गैरव्यवहारात कारवाई
मोठी बातमी! पुण्याच्या जमीन घोटाळ्यातील आरोपी शीतल तेजवानीला अटक; 300 कोटींच्या गैरव्यवहारात कारवाई
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Uddhav Thackeray Shivsena : गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटलेला, उद्धव ठाकरेंची टीका
Omraje Nimbalkar अतिवृष्टीच्या मदतीबाबत सरकारनं प्रस्ताव तातडीने पाठवावा,निंबाळकर 'माझा'वर EXCLUSIVE
Khasbag Kusti Maidan Kolhapur:50 लि. दूध,10पोती लिंबू,10 पोती हळद,10 डबे तेल,खासबाग मैदानाचा खुराक
Devendra Fadnavis Meet Sanjay Raut : देवेंद्र फडणवीसांनी घेतली संजय राऊतांची भेट
Maharashtra Municipal Election 2025 : जिल्हा परिषदांऐवजी महापालिका निवडणूक आधी होणार?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेतकरी मदतीचा प्रस्तावच दिला नाही म्हणत केंद्रानं 26/11 पर्यंतची आकडेवारी दिली, फडणवीस म्हणाले, ते जुनं उत्तर; रोहित पवार 27/11चं पत्र दाखवत म्हणाले, फडणवीस साहेब अजून किती खोटं बोलणार?
शेतकरी मदतीचा प्रस्तावच दिला नाही म्हणत केंद्रानं 26/11 पर्यंतची आकडेवारी दिली, फडणवीस म्हणाले, ते जुनं उत्तर; रोहित पवार 27/11चं पत्र दाखवत म्हणाले, फडणवीस साहेब अजून किती खोटं बोलणार?
Illegal Bike Taxi : बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालवणाऱ्या  रॅपीडो, उबेर  सारख्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करा, परिवहन मंत्र्यांचा आदेश
बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालवणाऱ्या  रॅपीडो, उबेर  सारख्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करा, परिवहन मंत्र्यांचा आदेश
संचार साथी अ‍ॅप मोबाईलमध्ये प्री-इन्स्टॉल नसणार; देशव्यापी फटकार बसताच केंद्र सरकारनं यू टर्न घेत नाद सोडला!
संचार साथी अ‍ॅप मोबाईलमध्ये प्री-इन्स्टॉल नसणार; देशव्यापी फटकार बसताच केंद्र सरकारनं यू टर्न घेत नाद सोडला!
मोठी बातमी! पुण्याच्या जमीन घोटाळ्यातील आरोपी शीतल तेजवानीला अटक; 300 कोटींच्या गैरव्यवहारात कारवाई
मोठी बातमी! पुण्याच्या जमीन घोटाळ्यातील आरोपी शीतल तेजवानीला अटक; 300 कोटींच्या गैरव्यवहारात कारवाई
अन्यथा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी निवडणूक आयुक्तांवर महाभियोग प्रस्ताव आणणार; नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितलं
अन्यथा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी निवडणूक आयुक्तांवर महाभियोग प्रस्ताव आणणार; नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितलं
Nanded Crime Love Story: नांदेडच्या प्रेमप्रकरणाचा जातीय विखारामुळे भयंकर शेवट, सक्षम ताटेची केस प्रकाश आंबेडकर लढवणार का? अंजली आंबेडकर म्हणाल्या...
सक्षम-आचलला न्याय देण्यासाठी प्रकाश आंबेडकर कोर्टात युक्तिवाद करणार? अंजली आंबेडकर म्हणाल्या...
Weakest Currency 2025 : डॉलरच्या तुलनेत सर्वात दुर्बल चलन कोणते? भारताचा रुपया कोणत्या क्रमांकावर?
डॉलरच्या तुलनेत सर्वात दुर्बल चलन कोणते? भारताचा रुपया कोणत्या क्रमांकावर?
बेळगावात अग्निवीरांचा शानदार दीक्षांत समारंभ; 31 आठवड्याचे खडतर प्रशिक्षण
बेळगावात अग्निवीरांचा शानदार दीक्षांत समारंभ; 31 आठवड्याचे खडतर प्रशिक्षण
Embed widget