एक्स्प्लोर

धरण उशाला, कोरड घशाला : पाणी टंचाईमुळे शेतकऱ्यांचे हाल, केळी आणि पपईच्या फळबागा संकटात, लाखोंचं नुकसान

Water crisis : संपूर्ण मराठवाड्यामध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पिण्यासाठी पाणी मिळत नाही, अशा अवस्थेत फळबागा कशा जोपासायच्या? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिलाय.

Water crisis : संपूर्ण मराठवाड्यामध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पिण्यासाठी पाणी मिळत नाही, अशा अवस्थेत फळबागा कशा जोपासायच्या? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिलाय. हिंगोली जिल्ह्यांमध्ये केळी आणि पपईच्या फळबागांची अवस्था दयनीय झाली आहे. 

संपूर्ण मराठवाड्यात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. घोटभर पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागत आहे. जिथे पिण्यासाठीच पाणी नाही, तिथं शेतातील फळबागा कशा जोपासायच्या ? असा प्रश्न पडलाय हिंगोली जिल्ह्यांमध्ये केळी आणि पपईच्या फळबागा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. परंतु या फळबागा कशा जोपासायच्या? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिलाय. हिंगोली जिल्ह्यातील आसोला येथील बालाजी ढोबळे यांनी त्यांच्याकडे असलेल्या विहिरीतील पाण्याच्या भरवशावर शेतामध्ये दोन एकर वर केळीची फळबाग लावली. परंतु आता विहिरीने तळ घातल्यामुळे हे फळबाग कशी जोपासायची असा प्रश्न ढोबळे यांना पडला आहे. हजारो रुपये खर्च करून शेतामध्ये ही दोन एकरची फळबाग जोपासली आहे. परंतु पाणी कमी पडत असल्यामुळे आणि वाढतं तापमान यामुळे केळीची फळबाग होरपळून निघत आहे. परिणामी केळीचे पाने पिवळी पडत आहेत वाळून जात आहेत, तर अनेक पान फाटली आहेत.  या वाढत्या तापमानात ही केळीची फळबाग जोपासायची असेल तर कमीत कमी आठ तास केळीला पाणी देणे गरजेचे आहे. परंतु जलसाठ्यांनी तळ गाठल्यामुळे केळीला पाणी कमी पडत आहे परिणामी मोठ्या प्रमाणात नुकसान होते आहे. 

हिंगोली जिल्ह्यातील पपईच्या फळबागांची जलसाठ्यांनी तळ गाठल्यामुळे पपईंच्या पिकाला पाणी देण्यासाठी पाणीच नाही. त्यामुळे पपईच्या फळबागा सुद्धा वाळून जात आहे का? झाडाला लागलेली फळे वाढत्या तापमानामुळे होरपळून जात आहेत. त्यामुळे ऐन पपई विक्रीच्या काळातच पाणीटंचाई आणि  तापमान वाढत आहे. त्यामुळे पपईच्या फळबागांना फटका बसतोय. 

परभणी जिल्ह्यात 17 टँकरने पाणी पुरवठा  

परभणी जिल्ह्यात मराठवाड्यातलं दुसरे मोठे धरण येलदरी असताना जिंतूर तालुक्यामध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. धरण उशाला कोरड घशाला अशी म्हणण्याची वेळ जिंतूर तालुका वासियांवर आली. कारण जिंतूर तालुक्यामध्ये जिल्ह्यात सुरू असलेल्या 17 पैकी 11 टँकर जिंतूरमध्ये सुरू आहेत. 154 विंधन विहिरींचेही अधिग्रहण करण्यात आले आहे. धरणात पाणी असताना तालुक्यातील अनेक गावांना पाणी मिळत नसल्याने गावकऱ्यांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली. तर जिंतुरच्या ब्राम्हणगाव येथे विहिरी बोअर आटल्याने टँकर आणुन 80 फूट खोल विहिरीत टाकुन तिथून महिलांना लहान मुलांना पाणी भरावे लागत आहे.

About the author माधव दिपके

माधव दिपके
Read More

महत्त्वाच्या बातम्या

कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
Snakebite : सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
BHMS Doctor Registration : मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
Maharashtra Government Cabinet Decision: पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget