एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
हिंदकेसरी पैलवान गणपतराव आंदळकर यांचं निधन
वयाच्या 83 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आंदळकर यांच्या निधनाने भारतीय कुस्तीवर शोककळा पसरली आहे.
पुणे : हिंदकेसरी पैलवान गणपतराव आंदळकर यांचं पुण्यातल्या रुग्णालयात हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झालं. वयाच्या 83 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आंदळकर यांच्या निधनाने भारतीय कुस्तीवर शोककळा पसरली आहे.
वयोमानामुळे गेल्या काही काळापासून त्यांची प्रकृती खालावलेली होती. नियमित तपासणीसाठी त्यांना रुग्णालयात नेलं जायचं. मात्र आज अचानक आलेल्या हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचं निधन झालं. कोल्हापूरला उद्या त्यांचं पार्थिव नेलं जाईल आणि अंत्यसंस्कार होतील.
गणपतराव आंदळकर यांचा अल्पपरिचय
शेतकरी कुटुंबात जन्मलेले गणपतराव आंदळकर 1950 मध्ये खास कुस्तीसाठी कोल्हापुरात आले. दरबारातील मल्ल बाबासाहेब वीर हे त्यांना वस्ताद म्हणून लाभले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते कुस्ती करू लागले. त्याचमुळे कोल्हापूरच्या राजर्षी छत्रपती शाहू स्मारक ट्रस्टचा शाहू पुरस्कार जाहीर झाला तेव्हा अर्जुन पुरस्कारापेक्षा अधिक आनंद झाल्याचं त्यांनी जाहीरपणे सांगितलं होतं. 1964 साली भारत सरकारने त्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित केलं.
आंदळकर यांनी 1960 मध्ये हिंदकेसरीची गदा पटकावली. पाकिस्तानी मल्ल गोगा पंजाबी, सादिक पंजाबी, जिरा पंजाबी, नसिर पंजाबी, दिल्लीचा खडकसिंग पंजाबी, अमृतसरचा बनातसिंग पंजाबी, पतियाळाचा रोहेराम, लिलाराम, पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे, महंमद हनिफ, श्रीरंग जाधव या नामवंत मल्लाबरोबरीच्या त्यांच्या लढती गाजल्या होत्या.
1962 मध्ये जकार्ता येथे झालेल्या अशियायी स्पर्धेत त्यांनी सुपर हेवी गटात ग्रीको रोमन स्टाईलमध्ये सुवर्णपदक, तर फ्री स्टाईलमध्ये रौप्यपदक पटकावलं. 1964 मध्ये टोकिओ ऑलिपिंकमध्ये हेवी गटात भारतीय कुस्ती संघाचं नेतृत्व आंदळकर यांनी केलं. तिथे त्यांनी चौथ्या फेरीपर्यंत धडक मारली होती. महाराष्ट्र सरकारतर्फे त्यांच्या कुस्ती क्षेत्रातील योगदानाबद्दल 1982 मध्ये शिवछत्रपती पुरस्काराने गौरवलं.
आंदळकर यांनी कधीही लाल मातीची संगत सोडली नाही. 1967 पासून मोतीबाग तालमीत कुस्ती प्रशिक्षक म्हणून जबाबदारी पार पाडताना त्यांनी अनेक मल्ल घडवले. त्यात महान भारत केसरी रूस्तम-ए- हिंद दादू चौगुले, महाराष्ट्र केसरी चंबा मुत्नाळ, अॅग्नेल निग्रो, महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर, संभाजी वरुटे, राष्ट्रकुल सुवर्णपद विजेता रामचंद्र सारंग, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील या मल्लांच्या नावांवरुनच त्यांच्या वस्तादगिरीची कल्पना येते.
1982 साली आंदळकरांना शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
करमणूक
राजकारण
क्रीडा
Advertisement