एक्स्प्लोर
मुंबई-नागपूर हायवेवर विजेची तार कोसळली, तीन बस जळून खाक
मुंबई-नागपूर महामार्गावर नशिराबादजवळ उभ्या असलेल्या बसेसवर ही तार कोसळली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
जळगाव : मुंबई-नागपूर महामार्गावर नशिराबादजवळ विजेची तार पडल्यामुळे मोठी दुर्घटना घडली. विजेची तार कोसळून झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे प्रसन्न ट्रॅव्हल्सच्या तीन बस जळून खाक झाल्या आहेत.
चालकाने प्रसंगावधान राखल्याने या घटनेत एका बसला वाचवण्यात आलं. मात्र तीन बसचं मोठं नुकसान झालं आहे. प्रसन्न ट्रॅव्हल्सच्या या बसेस आहेत.
मुंबई-नागपूर महामार्गावर नशिराबादजवळ उभ्या असलेल्या बसेसवर ही तार कोसळली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या पाच गाड्यांनी या आगीवर नियंत्रण मिळवलं.
दरम्यान, या घटनेनंतर मुंबई-नागपूर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळाली. पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न केला. बघ्यांची गर्दी झालेली असल्यामुळे इतर वाहनधारकांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
शिक्षण
महाराष्ट्र
Advertisement