एक्स्प्लोर

हिदायत पटेल हत्या प्रकरण! साडे तीन महिन्यानंतर फरार आरोपीला अटक, आरोपी काँग्रेसचा प्रभावशाली नेता

वरिष्ठ काँग्रेस नेते हिदायत पटेल यांच्या हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. फरार आरोपी राजू बोचे याला साडे तीन महिन्यानंतर नागपुरातून नाट्यमारित्या अटक केली आहे.

Hidayat Patel Murder Case : वरिष्ठ काँग्रेस नेते हिदायत पटेल यांच्या हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. फरार आरोपी राजू बोचे याला साडे तीन महिन्यानंतर नागपुरातून नाट्यमारित्या अटक केली आहे. हिदायत पटेल यांच्या नातेवाईकांनीच फरार आरोपीला पकडले आहे. राजू बोचे हा अकोल्यातील काँग्रेसचा प्रभावशाली नेता असून तो जिल्हा परिषदेचे माजी सभापती होता.

हिदायत पटेल यांच्यावर 6 जानेवारीला झाला होता जीवघेणा हल्ला

हिदायत पटेल यांच्यावर 6 जानेवारी रोजी अकोट तालुक्यातील मोहाळा गावातील मशिदीत जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर 7 जानेवारी रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. या हत्येच्या कटात सहभागी असल्याच्या आरोपावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद बुद्रुजम्मा, काँग्रेस नेते व माजी नगराध्यक्ष संजय बोडखे आणि राजू बोचे यांच्यावर अकोट शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. गुन्हे दाखल झाल्यानंतर तिन्ही आरोपी फरार होते.

तब्बल साडेतीन महिन्यांनंतर या प्रकरणातील एका फरार आरोपीला पकडण्यात यश

दरम्यान, आज नागपुरातील रवी भवन या शासकीय सर्किट हाऊस परिसरात हिदायत पटेल यांचे पुतणे फतेह पटेल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राजू बोचे याला पकडल्याची माहिती आहे. फरार राजू बोचे पकडला गेल्यानंतर त्याने आक्रमक पवित्रा घेत पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे बोचे आणि त्याला पकडणाऱ्या फतेह पटेल व त्यांच्या सहकार्यात चांगलीच झटापट ही झाली. त्यानंतर नागपूर पोलिसांनी बोचे याला ताब्यात घेत अकोट पोलिसांच्या स्वाधीन केले. तब्बल साडेतीन महिन्यांनंतर या प्रकरणातील एका फरार आरोपीला पकडण्यात यश आले आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद बुद्रुजम्मा आणि काँग्रेस नेते संजय बोडखे अद्याप फरार आहेत.

गुरुवारी दुपारी आरोपी रवीभवन परिसरात जेवणासाठी गेला होता. अकोट तालुक्यातील काही राजकीय कार्यकर्ते त्यावेळी त्याच परिसरात होते. त्यांनी राजूला ओळखले व त्याला पकडण्यासाठी धाव घेतली. त्यांच्यात झटापट झाली व राजूनेदेखील त्यांच्यावर हल्ला केला. लोकांनी त्याला चोप दिला व पोलिसांना फोन केला. सदर पोलीस ठाण्याचे पथक तातडीने तेथे पोहोचले व राजूला ताब्यात घेतले. पोलिसांनी अकोट ग्रामीणच्या पथकाला या प्रकाराची माहिती दिली. तेथील पथक सायंकाळी नागपुरात पोहोचले व त्याला त्यांच्या हवाली करण्यात आले.

कोण होते हिदायत पटेल?

हिदायत पटेल प्रदेश काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि अकोल्यातील काँग्रेसचा प्रभावी मुस्लिम चेहरा होते.

अकोला जिल्हा काँग्रेसचे ते 8 वर्ष जिल्हाध्यक्ष राहिले..

2014 आणि 2019 मध्ये काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीत अकोल्यातून उमेदवारी मिळाली होती..

2014 मध्ये दुसऱ्या तर 2019 मध्ये तिसऱ्या स्थानावर राहून पराभूत झाले होते..

हिदायत पटेल जिल्ह्यातील मोठे सहकार नेते ही होते.. 25 वर्षे जिल्हा बँकेचे संचालक होते.. अकोट तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष आणि अकोट बाजार समितीचे माजी सभापती आणि संचालक राहिले होते..

 

महत्त्वाच्या बातम्या

OBC Reservation Sarpanch: ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
Ramdas Athawale: सर्व मराठ्यांना कुणब्यांचे प्रमाणपत्र मिळणे अशक्य; मराठा समाजाला खुशाल आरक्षण द्या, पण...; केंद्रीय मंत्री रामदास आठवले स्पष्टचं बोलले
सर्व मराठ्यांना कुणब्यांचे प्रमाणपत्र मिळणे अशक्य; मराठा समाजाला खुशाल आरक्षण द्या, पण...; केंद्रीय मंत्री रामदास आठवले स्पष्टचं बोलले
Prasad Oak On Dharamveer Movie: 'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
Satara Politics: शिवेंद्रराजेंनी साताऱ्याचे पालकमंत्री व्हावे; जयकुमार गोरेंच्या वक्तव्याने राजकीय चर्चेला उधाण; तर शेखर गोरेंची सातारा जिल्हा बँकेसाठी पुन्हा तयारी
शिवेंद्रराजेंनी साताऱ्याचे पालकमंत्री व्हावे; जयकुमार गोरेंच्या वक्तव्याने राजकीय चर्चेला उधाण; तर शेखर गोरेंची सातारा जिल्हा बँकेसाठी पुन्हा तयारी

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
OBC Reservation Sarpanch: ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Kolhapur School Road Crisis: चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
Latur Crime News: आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
Kolhapur Crime: एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
Embed widget