एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी पावसाचं दमदार पुनरागमन
मुंबई : रविवारी वरुणराजा मुंबईकरांवर मेहेरबान झाला असून, मोठ्या प्रतीक्षेनंतर मुंबईत दमदार पाऊस झाला. रात्री मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसानं चांगलीच हजेरी लावली. मुंबईच्या दक्षिण भागासह पश्चिम उपनगरांमध्ये जोरदार पाऊस झाला. रात्रभर बरसलेल्या पावसामुळे मुंबई महापालिकेचा दावाही फोल ठरताना दिसतो आहे.
रात्रभर बरसलेल्या पावसामुळे मालाड पश्चिममध्ये मार्वे रोडवरही पाणी साचलं. तसंच दादरमधील हिंदमातामध्येही सगळीकडे पाणी साचल्याचंच चित्र आहे. आज सकाळपासून कुलाबा परिसरात 5 मिमी तर सांताक्रुझ परिसरात 37 मिमी पावसाची अत्तापर्यंत नोंद करण्यात आली आहे. याशिवाय
मुंबईतील पूर्व उपनगरामध्ये 91 मिमी तर पश्चिम उपनगरांमध्ये 31 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
मुंबईतल्या पहिल्या मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मुसळधार पावसामुळे ठाण्यातल्या कळवा-मुंब्रा रेल्वे स्थानकात रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं. तर दुसरीकडे नवी मुंबईतही तुफान पावसामुळे ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक कोलमडली आहे.
दरम्यान आज दुपारी 1 च्या सुमारास मोठी भरती असल्यानं मुंबईत पाणी साचण्याची शक्यता जास्त आहे.
नवी मुंबईसह पनवेल परिसरात महापे,रबाळे,ऐरोली भागांतही रात्रभर मुसळधार पाऊस झाला. दुसरीकडे डहाणू बोर्डी येथे विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरु आहे. मीरा रोड मध्येही जोरदार पाऊस सुरु आहे.
उत्तर महाराष्ट्रात नाशिकसह इगतपुरीमध्येही मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. पावसाच्या पुनरागमनामुळे बळीराजा सुखावला आहे. त्यामुळे शेतीच्या कामांना वेग येणार आहे.
मुंबईसह राज्याच्या विविध ठिकाणी बरसलेल्या पावसाची नोंद
कुलाबा 5.2 मिमी
सांताक्रूझ 37.0 मिमी
मुंबई शहर - 5.2 मिमी
पूर्व उपनगर - 91 मिमी
पश्चिम उपनगर - 31 मिमी
लोणावळा 150 मिमी
वसई 46 मिमी
नवी मुंबईत-98 मिमी
LIVE UPDATE : पावसामुळे मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वाहतूक खोळंबली, महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
LIVE UPDATE : मुबंई -पुणे जुन्या हायवेवरील बोरघाटात दरड कोसळली, पोलीस आणि स्थानिकांकडून दरड हटवण्याचे काम सुरु
LIVE UPDATE : ठाण्याच्या पुढे मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प
LIVE UPDATE : दुपारी मोठी भरती असणार , 1 वाजून 7 मिनिटांनी 4.97 मीटर ची हायटाईड
LIVE UPDATE : मुंबईच्या पूर्व, पश्चिम उपनगरात पावसाचा जोर जास्त आहे
LIVE UPDATE : दिवसभर मुसळधार पावसाची शक्यता
LIVE UPDATE : पश्चिम उपनगरांत पावसाची संततधार, मालाड सबवेमधे पाणी साचल्यानं एकेरी वाहतूक सुरू
LIVE UPDATE : ठाण्यातील मानपाडा परिसरात निळकंठ सोसायटीजवळ महापालिकेच्य़ा कार्यालयाची भिंत कोसळली, 2 गाड्यांचं नुकसान
LIVE UPDATE : ठाणे : कळवा,मुंब्रा परिसरात मुसळधार पाऊस, कळवा स्टेशनजवळ रेल्वेरुळावर पाणी साचल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
LIVE UPDATE : नवी मुंबईत तुफान पाऊस, वाशी ट्रान्सहार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प
LIVE UPDATE : मुंबईच्या मालाड, दादर, हिंदमाता परिसरात पाणी साचलं
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement