Maharashtra Rain : डोंबिवली, बदलापूर, वांगणीत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, वाऱ्याचा वेग 107 KMPH, आकाशात काळ्याकुट्ट ढगांची गर्दी
Maharashtra Rain Update : रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, आणि धुळ्यात पुढील तीन ते चार तास वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज
Maharashtra Rain Update : ठाणे, डोंबिवली आणि पालघर परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाला सुरूवात झाली आहे. पुढील 3 ते 4 तास वाऱ्याचा वेग ताशी 50 ते 60 किमी प्रति तास असून काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सोबतच नगर जिल्ह्यात देखील विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
डोंबिवलीमध्ये गेल्या काही वेळापासून अचानक वादळाला सुरुवात झाली आणि काही ठिकाणी वादळासह पाऊसही सुरू झाला. त्याचवेळी बदलापूरमध्येही जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरूवात झाली. या ठिकाणच्या पावसाचा वेग हा 107 किमी इतका असल्याचं सांगितलं जातं.
Nashik, Palghar, Thane, ghat areas of Pune Satara, possibility of thunderstorms during next 3,4 hrs
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 13, 2024
Marathwada region development is being observed. Let's keep watch. pic.twitter.com/mjCT7glknW
पुणे, रायगड, रत्नागिरीसह अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज
पुणे आणि रायगड जिल्ह्यात देखील पुढील 3-4 तास अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, आणि धुळ्यात पुढील 3 ते 4 तास वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
उत्तर मध्य महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि सोसाट्याचा वारा (50-60 किमी प्रतितास वेग) , हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
बदलापूरमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे तर कल्याण, डोंबिवलीत धुळीसह जोरदार वारा वाहत असून काही ठिकाणी पावसाला सुरूवात झाली आहे.
विक्रोळी, भांडूप, मुलुंड परिसरात ढगाळ वातावरण झालं असून जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला आहे.
भिवंडीमध्ये अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडीत
भिवंडी लोकसभा क्षेत्रात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. शहापूर, वाडा तसेच भिवंडी तालुक्यात शहर व ग्रामीण भागामध्ये मागील एका तासापासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाली आहे. गेल्या अनेक दिवसापासून उकाड्याने त्रस्त नागरिकांना या पावसामुळे थोडासा का होईना दिलासा मिळाला आहे .
पालघर जिल्ह्यातील जव्हार, मनोर, चारोटी, महालक्ष्मी भागात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस सुरू झाला आहे. अचानक अवकाळी सुरू झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी जांभूळ आणि आंबा पिकाला धोका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ही बातमी वाचा: