एक्स्प्लोर
नाशिकमध्ये मुसळधार पाऊस, धरणं तुडुंब, गोदामाईला पूर
नाशिक : नाशिक जिल्ह्यातली गंगापूर धरणातून पाणी सोडल्यानं गोदावरी नदीला पूर आला आहे. गोदावरी नदीच्या वाढलेल्या पाण्यामुळं नाशकातील दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी वाढलं आहे.
पाहा फोटो : गोदामाईला पूर, दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी
मुसळधार पावसानं नाशिक जिल्ह्यातली धरणं तुडुंब भरली आहेत. त्यामुळं सध्या गंगापूर धरणातून 3 हजार 647, दारणा धरणातून 11 हजार 688, नांदुर मध्यमेश्वर- 10 हजार 925 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येतो आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून नाशकात पूर स्थिती निर्माण झाली आहे.पाहा फोटो : गोदामाईला पूर, दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी
नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे या भागातील धरणाच्या पाणी साठयात मोठी वाढ झालेली आहे व त्यामुळे या धरणांतून आज पहाटे 5 वाजल्यापासून पाण्याचा विसर्ग केला जात आहे :- गंगापूर धरणा - 12555 क्यूसेक (गोदावरी नदीत)
- दारणा धरणा -16800 क्युसेक (दारणा नदीत)
- पालखेड धरणा - 7376 क्युसेक (कादवा नदीत)
- कडवा धरणा - 8000 कुसेक्स ( दारणा नदीत)
- नदीकाठावर पूर बघणेसाठी गर्दी करू नका
- पुराचा धोका लक्षात घेवून त्वरीत सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत व्हा.
- पुराचा वेग बघतां पुरामध्ये पोहण्याचे दु:साहस करू नका
- महानगरपालिका आपले सुरक्षिततेसाठी प्रयत्नशील असून त्याकरीता कार्यरत आहे. कृपया महानगरपालिकेच्या कर्मच्यार्यांना सहकार्य करा
पाहा फोटो : गोदामाईला पूर, दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement