एक्स्प्लोर

पुणे, रायगड आणि नाशिकमध्ये तुफान पाऊस, रस्ते तुंबले, अनेक भागात कमरेइतकं पाणी

गेल्या दोन ते तीन दिवसापासून पावसाचा (Rain) जोर कमी झाला होता. मात्र, आजपासून पुन्हा राज्याच्या विविध भागात पावसानं धुमाकूळ (Heavy Rain) घातला आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं आहे.

Maharashtra Rain : गेल्या दोन ते तीन दिवसापासून पावसाचा (Rain) जोर कमी झाला होता. मात्र, आजपासून पुन्हा राज्याच्या विविध भागात पावसानं धुमाकूळ (Heavy Rain) घातला आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. राज्यातील पुणे, रायगड आणि नाशिक जिल्ह्यात तुफान पाऊस सुरु आहे. अनेक भागात रस्ते तुंबले आहेत तर काही भागात रस्त्यांवर कंबरेइतकं पाणी साचलं आहे. 

Raigad Rain : रायगड जिल्ह्यात तुफान पाऊस, नागोठणे शहरात मोठ्या प्रमाणात पाणी 

रायगड जिल्ह्याला आज मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढला आहे. आज हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळं रायगड जिल्ह्यात अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. या मुसळधार पावसाचा मोठा फटका रोहा आणि सुधागड तालुक्यातील पाली नागोठणे शहरामध्ये बसलेला पाहायला मिळत आहे. रोहा तालुक्यातल्या कुंडलिका आणि सुधागड तालुक्यातल्या पाली विभागातून जाणाऱ्या अंबा नदीने धोका पातळी ओलांडल्यामुळे सकल भागात पाणी साचलं आहे. नागोठणे शहरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे येथील नागरिक आता सुरक्षित स्थळी जात आहेत. त्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. नागोठणे मधील एसटी बस स्थानक देखील पाण्यात गेल्यामुळे येथील प्रवाशांची तारांबळ उडाले तर तिकडे अंबा नदीने धोका पातळी ओलांडल्यामुळे पाली खोपोली रस्ता बंद अवस्थेत पडलाय. 

खेडमध्ये जगबुडी नदीने ओलांडली धोक्याचे पातळी

खेडमध्ये जगबुडी नदीने धोक्याचे पातळी ओलांडली आहे. नगरपरिषदेने सायरन देऊन नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.जगबुडीचे पाणी मटन मार्केट परिसरामध्ये शिरलं आहे. जगबुडी नदी शेजारील सर्विस रोड पाण्याखाली गेल्यामुळे खाडी पट्ट्यातील गावांचा खेडमध्ये येणारा जवळचा मार्ग बंद झाला आहे. पावसाचा जोर कायम असल्यामुळे खेड शहराला पुराचा धोका कायम आहे. .

Pune Rain : पुणे शहरासह परिसरात सकाळपासून मुसळधार पाऊस

पुणे शहरासह परिसरात सकाळपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. खडकवासला धरण साखळी क्षेत्रात मोठा पाऊस सुरु आहे. खडकवासला धरणातून 2000  क्युसेक पाणी सोडण्यात येणार आहे. खडकवासला धरणातून मुळा मुठा नदीत 2000 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. धरण साखरी क्षेत्रात सुरु असणाऱ्या सततच्या पावसामुळे पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. पुणे शहरातील भिडे पुलाला पाणी लागलं आहे. पाऊस असाच राहील तर भिडे पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. लोणावळा लगतच्या मळवली ते देवळे गावचा संपर्क तुटलाय. ओढे-नाल्याच्या ठिकाणी पाणी रस्त्यावर आलंय. पुणे-लोणावळा रेल्वेतून हा परिसर कसा जलमय झालाय, हे टिपण्यात आलाय. सकाळी रस्त्यावर गुडघाभर पाणी होतं आता पावसाने थोडी विश्रांती घेतल्यानं परिस्थिती पूर्वपदावर येईल अशी अपेक्षा आहे. सध्या मळवली ते देवळे गावच्या ग्रामस्थांना लोणावळा मार्गे वळसा मारावा लागतोय.

Nashik Rain : नाशिक जिल्ह्यातही पावसाचा धुमाकूळ, गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ  

नाशिक जिल्ह्यात देखील सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे. सकाळपासून शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसामुळे नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. रामकुंड आणि गोदा घाट परिसरात गोदावरीची पाणी पातळी वाढली आहे. आज नाशिकला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्रंबकेश्वरमध्ये देखील पावसाला सुरुवात झाली आहे. शहरातील काही भागात रस्त्यावर पावसाचं पाणी साचले आहे. शहरातील रस्त्यावरून पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यास अडथळा येत असल्याने शहरातील मुख्य चौकात रस्ते जलमय झाले आहेत. अर्धा एक तासातच रस्ते जलमय झाल्यान मान्सून पूर्व कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. 

महत्वाच्या बातम्या:

Raigad Heavy Rain: जगबुडीने इशारा पातळी ओलांडली, नदीचं पाणी शहरात घुसलं, रायगड जिल्ह्यात धडकी भरवणारा पाऊस

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Municipal Corporation History: महाविकास आघाडीचा पॅटर्न पहिल्यांदा राज्याला देणाऱ्या कोल्हापूर मनपात यंदा काय होणार? 10 वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत काय घडलं?
महाविकास आघाडीचा पॅटर्न पहिल्यांदा राज्याला देणाऱ्या कोल्हापूर मनपात यंदा काय होणार? 10 वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत काय घडलं?
Sanjay Raut Rahul Gandhi : मुंबईत भाजपला रोखायचं असेल तर मविआच्या मतांची फाटाफूट नको, संजय राऊतांचा राहुल गांधींना फोन, ठाकरे-काँग्रेस एकत्र लढणार?
मुंबईत भाजपला रोखायचं असेल तर मविआच्या मतांची फाटाफूट नको, संजय राऊतांचा राहुल गांधींना फोन
भरधाव कार झाडावर आदळली, तिघांचा जागीच मृत्यू, 2 गंभीर; मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात
भरधाव कार झाडावर आदळली, तिघांचा जागीच मृत्यू, 2 गंभीर; मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात
नगरपालिका निवडणुकीत तिघांनी मिळून 15 हजार करोड उडवले; संजय राऊतांचा खळबळजनक दावा
नगरपालिका निवडणुकीत तिघांनी मिळून 15 हजार करोड उडवले; संजय राऊतांचा खळबळजनक दावा

व्हिडीओ

Priti Band on Amravati Corporation Election : सन्मानजनक जागा मिळाल्या तरच युती होईल अन्यथा....
Sudhir Mungantiwar : मुख्यमंत्रिपद येतं-जातं, परमनंट कोणीच नाही
Sanjay Raut On Thackeray Brothers Yuti : शिवडीमधील ३ प्रभागांवरून अडकलेल्या जागावाटपाची चर्चा पूर्ण
Railway Tickit : मासिक तिकीट काढणाऱ्यांना भाडेवाढीचा फटका नाही, खिशाला कात्री बसणार
Bajirao Dharmadhikari : सोनवणेंनी खासदारकीची गरिमा संपवली, बाजीराव धर्माधिकारी यांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Municipal Corporation History: महाविकास आघाडीचा पॅटर्न पहिल्यांदा राज्याला देणाऱ्या कोल्हापूर मनपात यंदा काय होणार? 10 वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत काय घडलं?
महाविकास आघाडीचा पॅटर्न पहिल्यांदा राज्याला देणाऱ्या कोल्हापूर मनपात यंदा काय होणार? 10 वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत काय घडलं?
Sanjay Raut Rahul Gandhi : मुंबईत भाजपला रोखायचं असेल तर मविआच्या मतांची फाटाफूट नको, संजय राऊतांचा राहुल गांधींना फोन, ठाकरे-काँग्रेस एकत्र लढणार?
मुंबईत भाजपला रोखायचं असेल तर मविआच्या मतांची फाटाफूट नको, संजय राऊतांचा राहुल गांधींना फोन
भरधाव कार झाडावर आदळली, तिघांचा जागीच मृत्यू, 2 गंभीर; मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात
भरधाव कार झाडावर आदळली, तिघांचा जागीच मृत्यू, 2 गंभीर; मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात
नगरपालिका निवडणुकीत तिघांनी मिळून 15 हजार करोड उडवले; संजय राऊतांचा खळबळजनक दावा
नगरपालिका निवडणुकीत तिघांनी मिळून 15 हजार करोड उडवले; संजय राऊतांचा खळबळजनक दावा
थरारक हत्याकांडाचा उलगडला, कारमध्ये आढळून आलेला मृतदेह; पोलिसांनी अशी फिरवली चक्रे, आरोपीला बेड्या
थरारक हत्याकांडाचा उलगडला, कारमध्ये आढळून आलेला मृतदेह; पोलिसांनी अशी फिरवली चक्रे, आरोपीला बेड्या
Gold Price : सोन्याचा दर 3 लाख रुपयांचा टप्पा पार करणार, अमेरिकन अर्थतज्ज्ञाचा मोठा दावा, आज सोने किती महागले?
सोन्याचा दर 3 लाख रुपयांचा टप्पा पार करणार, अमेरिकन अर्थतज्ज्ञाचा मोठा दावा, आज सोने किती महागले?
मोठी बातमी : 'पार्थ पवार दोषीच, अजित पवार संत नाहीत', दमानिया-कुंभार आक्रमक, पुरावे दाखवत मुख्यमंत्र्यांना खडे सवाल
मोठी बातमी : 'पार्थ पवार दोषीच, अजित पवार संत नाहीत', दमानिया-कुंभार आक्रमक, पुरावे दाखवत मुख्यमंत्र्यांना खडे सवाल
बाळापूर नगरपालिकेवर खतीब घराण्याची 65 वर्षांची सत्ता उलथवली, 30 वर्षीय डॉ.आफरीन नगराध्यक्ष, सांगितलं पहिलं काम?
बाळापूर नगरपालिकेवर खतीब घराण्याची 65 वर्षांची सत्ता उलथवली, 30 वर्षीय डॉ.आफरीन नगराध्यक्ष, सांगितलं पहिलं काम?
Embed widget