Heatwave in Maharashtra : पारा वाढला, महावितरणला घाम फुटला; नागरिक उकाड्यामुळं हैराण, वीजेच्या मागणीत विक्रमी वाढ
मागणी वाढली तरीही विजेची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून राज्याचे ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः लक्ष ठेवून आहेत, ते अधिकाऱ्यांना वारंवार सूचना देतायेत, अशी माहिती महावितरणचे जनसंपर्क अधिकारी भारत पवार यांनी दिली.
मुंबई : राज्यात उष्णतेचा (Maharashtra Heat) पारा वाढत असतानाही महावितरणने गुरुवारी 23 हजार 571 मेगावॅट इतका विक्रमी वीज पुरवठा केला आणि त्यामुळे भारनियमन टळलं. विदर्भ आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पारा 43 ते 44 अंशांवर जातोय. त्यातच, ग्रामीण भागांमध्ये देखील एसीचा वापर प्रचंड वाढला आहे. त्यामुळे महावितरण अन्य वीज कंपन्यांकडून वीज खरेदी करून महाराष्ट्राची विजेची गरज भागवतंय. मागणी वाढली तरीही विजेची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून राज्याचे ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः लक्ष ठेवून आहेत, ते अधिकाऱ्यांना वारंवार सूचना देतायेत, अशी माहिती महावितरणचे जनसंपर्क अधिकारी भारत पवार यांनी दिली.
कमी पडलेला पाऊस आणि वीजेची वाढलेला मागणी याचा फटका आता राज्याला बसणार असून राज्यावर लोडशेडिंगचे संकट घोंघावत आहे. महाराष्ट्राला आता लोडशेडिंगचा फटका बसणार असून मागणी वाढली आहे.
महाराष्ट्रात गेल्या 11 दिवसांत किती वीजपुरवठा करण्यात आला?
राज्यात विक्रमी वीजपुरवठा
- 12 मे - 22 हजार 33 मेगावॅट
- 14 मे - 22 हजार 619 मेगावॅट
- 16 मे - 22 हजार 422 मेगावॅट
- 18 मे- 23 हजार 72 मेगावॅट
- 19 मे - 22 हजार 420 मेगावॅट
- 21 मे - 24 हजार 418मेगावॅट
- 22 मे - 24 हजार 604 मेगावॅट
- 23 मे - 23 हजार 579 मेगावॅट
राज्याच्या कोणत्याही भागात वीजेचे भारनियमन नाही
गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये उष्णतेची लाट आली आहे. त्यामुळे वीजेची मागणी देखील सातत्याने वाढत आहे. त्र तापमानात वाढ होत असल्याने येत्या काही दिवसांमध्ये वीज मागणी ही 24 हजार मेगावॅटच्या घरात जाण्याची शक्यता आहे. या परिस्थितीत वीजेची विक्रमी मागणी पूर्ण करताना राज्याच्या कोणत्याही भागात वीजेचे भारनियमन करण्यात आलेले नाही व तशी गरज भासणार नाही याबाबत काळजी घेतली जात आहे. त्यासाठी सध्या महावितरणकडून मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तींच्या कामांना वेग देण्यात आला .
ऊर्जामंत्री देवेंद्र फडवणीस स्वतः लक्ष देऊन
ग्रामीण भागातही वातानुकूलित यंत्रांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्यामुळे विजेची मागणी वाढत आहे. वाढत्या मागणीमुळे वीज टंचाई निर्माण होऊ नये म्हणून ऊर्जामंत्री देवेंद्र फडवणीस स्वतः दक्षता घेत आहेत, याबाबत अधिकाऱ्यांना वारंवार सूचना देऊन वीज पुरवठ्याची काळजी घेत आहेत, अशी माहिती महावितरणचे अधिकारी यांनी दिली.
हे ही वाचा :
उष्माघातानं सांगलीत तब्बल 1200 बॉयलर कोंबड्यांचा मृत्यू, लाखो रुपयांचं नुकसान