Rajesh Tope : राज्यात तिसरी लाट आलीच तर ती ओमायक्रॉन व्हेरियंटची असेल, असा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. लस न घेतलेल्या लोकांची गावानिहाय आणि शहरात वार्डनुसार यादी तयार करण्यात येणार आहे. तसेच त्यांना व्यक्तीगत मेसेज पाठवण्यात येणार आहेत. पुढील 20 दिवसांत राज्यात पहिल्या डोसचं शंभर टक्के लसीकरण पूर्ण होईल, असा विश्वास आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला. तसेच राज्य सरकारने कोरोना मृत्यूचे कोणतेही आकडे लपवले नसल्याचं स्पष्टीकरणही राजेश टोपे यांनी दिलं आहे. 

आरोग्य कर्मचारी प्रत्येकाला घरोघरी जाऊन लस घेण्याची विनंती करत आहेत. अशाच गतीने काम राहिले तर पुढील 20 दिवसांमध्ये राज्यात पहिल्या डोसचे 100 ट्के लसीकरण पूर्ण होईल, असा विश्वास आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला. यावेळी राजेश टोपे यांनी कोरोना मृत्यूची आकडेवारी लपवली नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. सांख्याकी आकडेवारी आणि आमच्या आकडेवारीमध्ये जो काही तफावत दिसतोय त्याला काही कारणं आहेत. ही कारण आम्ही प्रेस नोटच्या माध्यमातून दिली आहेत. लोकसंख्येच्या दरानुसार मृत्यूचे दर ठरवला जातो. त्यामध्ये तफावत आढळून आली आहे. पण कोरोना मृत्यूची संख्या आतापर्यंत लपवलेली नाही. काहीही चूक केलेली नाही, असे टोपे म्हणाले. "कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची आकडेवारी लपवलेली नाही. अनेकवेळा डिस्चार्ज झाल्यानंतर वेगळ्या कारणाने मृत्यू झाल्यामुळे त्याची नोंद कोरोना मृत्यू मध्ये होत नाही. स्वॅब न घेता केवळ सिटी स्कॅन रिपोर्टवरून पॉझिटिव्ह ठरवलेल्या रुग्णांची संख्या पोर्टलवर अपलोड झालेले नाही. त्यामुळे आकडेवारी मध्ये फरक दिसस असेल" असे टोपे म्हणाले. 

राजेश टोपे काय म्हणाले?

राज्यातील लसीकरण - 
राज्यातील आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आतापर्यंत 12 कोटी 84 लाख 19 हजार 884 लसीचे डोस देण्यात आले आहेत. सोमवारी राज्यात सहा लाख 38 हजार 777 लसीचे डोस देण्यात आले आहेत. 

महत्वाच्या बातम्या -  

 Omicron : तिसरी लाट आली तर ओमायक्रॉनचीच, आरोग्यमंत्री राजेश टोपेंचा इशारा