एक्स्प्लोर

Beed News : बीडमध्ये हवाला रॅकेटचा पर्दाफाश, पोलिसांच्या छाप्यात 51 लाख रुपये जप्त

Beed News : बीड शहर पोलिसांनी एका हवाला रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. यावेळी तब्बल 51 लाख रुपयांची बेहिशोबी रक्कम हस्तगत केली आहे.

बीड : शहरामध्ये आयकर चुकवून टोकण पद्धतीने पैशाची देवाण-घेवाण करणाऱ्या एका हवाला रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. सहायक अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने बीड शहरात तीन ठिकाणी धाडी टाकून तिघांना ताब्यात घेत तब्बल 51 लाख रुपयांची बेहिशोबी रक्कमही हस्तगत केली आहे.

बीड शहरामध्ये बेकायदेशीररीत्या हवाला रॅकेट सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पथक रवाना केले. या पथकाने शहरातील कबाडगल्लीतील न्यू इंडिया अंगडिया, जालना रोडवरील आर क्रांती ट्रेडर्स आणि सिध्दीविनायक कॉम्प्लेक्ससमोरील एका ठिकाणी छापा टाकला. यात अनुक्रमे 35 लाख 79 हजार रुपये, 9 लाख रुपये, 6 लाख 41 हजार रुपये अशी एकूण 51 लाख 26 हजार रुपयांची बेकायदेशीर रोकड आढळून आली. याबाबत त्याठिकाणी असणाऱ्यांना विचारपूस केली तेव्हा त्यांना हिशेब देता आला नाही. मयूर विठ्ठल बोबडे, हरीश रतीलाल पटेल, सूरज पांडुरंग घाडगे अशी त्यांची नावे आहेत. यासोबतच तिन्ही ठिकाणच्या व्यवस्थापकांना ताब्यात घेतले आहे.

हवाला रॅकेटमध्ये आणखी काही जणांवर संशय

हवाला रॅकेटद्वारे पैशांची फिरवा फिरवी करणारे आणखी काही संशयित पोलिसांच्या रडावर आले आहेत. ताब्यात घेतलेल्या तीन जणांना पैसे फिरवण्यास कुणी सांगितले, हे पैसे ते कुणाला देणार होते याबाबत पोलिस चौकशी करीत आहेत. त्यांच्या चौकशीतून आणखी काही नावे समोर येण्याची शक्यता आहे.

पैसे मोजण्याचे यंत्र, मोबाइल जप्त

ज्या ठिकाणी पोलिसांनी ही कारवाई केली. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पैशाचा व्यवहार होत असल्याने शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण कारवाई दरम्यान पैसे मोजण्याचे यंत्र, मोबाइल आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. हवाला रॅकेटचे इतर ठिकाणचे कनेक्शन देखील या कारवाईमुळे समोर येण्याची शक्यता आहे. थेट कार्यालय थाटून हवाला रॅकेट सुरु असल्याचं समोर आल्यानं खळबळ उडाली आहे.

आयकर विभागाला देणार पत्र

या कारवाईत पकडलेल्या तिन्ही संशयितांकडे कसून चौकशी पोलिस करत आहेत. हवाला रॅकेट कसे चालायचे, किती रुपयांचा व्यवहार व्हायचा, कमिशन किती मिळायचे? या सर्वाबाबत चौकशीतून योग्य माहिती निष्पन्न होईल. पोलीस आयकर विभागाला पत्र देणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

हे ही वाचा -

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

1 Min 1 Constituency : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 15 Nov 2024 : Vidhan Sabha : Maharashtra ElectionRaj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मलाNashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला,  नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडाShreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
मोठी बातमी! भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
Embed widget