एक्स्प्लोर
हर्षवर्धन पाटलांची बुलेट राईड, मागच्या सीटवरील व्यक्ती पाहून सगळेच आवाक
इंदापूर (पुणे) : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापुरात बुलेटवरुन फेरफटका मारला. मात्र, यावेळी बुलेटवर त्यांच्या मागे बसलेली व्यक्ती पाहून उपस्थित आवाक झाले. शिवाय, इंदापुरात नवीन राजकीय समीकरणे जुळतायेत की काय, अशा चर्चाही सुरु झाल्या.
इंदापूर शहरातील रॉयल इनफिल्ड गाडीच्या नवीन मॉडेलचे लॉन्चिंग माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तिथे कधी काळी हर्षवर्धन पाटील यांच्या बरोबर आसणारे पण सध्या अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली खाली असलेल्या छत्रपती साखर कारखान्याचे संचालक अविनाश घोलप हे देखील या कार्यक्रमात उपस्थित होते.
या कार्यक्रमावेळी हर्षवर्धन पाटील यांनी बुलेट गाडीवर चक्क अविनाश घोलप यांना मागच्या सीटवरुन बसवून शहरात चक्कर मारली. सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. त्यात या दोघांनी एकाच गाडीवर शहरातून फेरफटका मारल्याने तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे.
सध्या घोलप हे राष्ट्रवादीच्या कळपात आहेत. त्यांच्या भागातील जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारी ही त्यांच्याच घराण्याला दिली जाते हा आजपर्यंतचा इतिहास आहे. या फेरफटक्यामुळे काँग्रेसकडून त्यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा आहे. तसे झाले तर विद्यमान राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे व राष्ट्रवादीची धाकधुकी नक्कीच वाढणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement