मुंबई : आम्ही गेले दीड महिना काळजी घेत आहोत. पण लोकांचा संयम सुटत चालला आहे. त्यांची थांबण्याची मानसिकता राहिली नसल्याची प्रतिक्रिया महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली दिली. मजुरांना जाण्यासाठी रेल्वेने सोय करावी ही मागणी मुख्यमंत्र्यांनी अनेकदा केंद्राकडे केली आहे. आम्ही मजूर पाठवायला तयार आहोत पण गुजरात, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, कर्नाटक, ओडीशा ही राज्ये मजुरांना स्वीकारायला तयार नसल्याचं थोरातांनी सांगितले. औंरगाबादमध्ये मालगाडीच्या धडकेत 16 मजुरांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. दरम्यान, औरंगाबादची घटना गंभीर असल्याचे थोरात म्हणाले.
औंरगाबादमध्ये मालगाडीच्या धडकेत 16 मजुरांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. जालना-औरंगाबाद मार्गावर करमाडजवळ हा अपघात घडला. हे सर्व मजूर जालन्यातून भुसावळला जात असतानाच पहाटे चार वाजता ही दुर्दैवी घटना घडल्याची माहिती मिळत आहे. या घटनेनंतर लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेल्या मजुरांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. देशभरातील लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मजुरांसाठी केंद्राने श्रमिक विशेष रेल्वे सुरू केली आहे. मात्र, यासाठी नाव नोंदणी, तपासणी अशी प्रक्रिया आहे. शिवाय एका वेळी फक्त हजार ते बाराशे लोक या ट्रेनमधून जाऊ शकतात. दुसरीकडे लॉकडाऊन कधी संपेल याचीही शाश्वती नाही. त्यामुळे नागरिकांचा संयम सुटत चालला आहे. परिणामी हजारो नागरिकांना पायीच गावी जाण्याच निर्णय घेतला आहे.
येत्या दहा दिवसात सार्वजनिक वाहतूक सुरु होणार : नितीन गडकरी
मजुरांना राज्ये सरकारे घ्यायला तयार नाहीत
पहिल्या लॉकडाऊनपासून आम्ही अडकलेल्या मजुरांना त्यांच्या राज्यात जाण्याची सोय करण्याची मागणी आम्ही केंद्राकडे करत होतो. सध्या मजुरांच्या हाताला काम नसल्याने त्यांची उपासमार होत आहे. परिणाणी त्यांचा संयम सुटत चालला आहे. आता केंद्राने श्रमिक विशेष रेल्वे सुरू केल्या आहेत. आम्हीही मजुरांना पाठवायला तयार आहे. मात्र, काही राज्य त्यांच्या मजुरांना स्वीकायरायला तयार नसल्याचं महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले. गुजरात, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, कर्नाटक ही राज्ये मजुरांना स्वीकारायला तयार नाहीत. मजुरांना स्वीकारण्यासाठी त्यांच्या काही अटी आहेत. तर ओडिशामध्ये तिथल्या हायकोर्टाने आदेश दिलेत, की मजुरांची टेस्ट करूनच राज्यात घ्या, हे आव्हान आमच्यापुढे देखील असल्याचं थोरात म्हणाले.
Lockdown | आगामी काळात सार्वजनिक वाहतूक सुविधा सुरु करण्याचा विचार : नितीन गडकरी
कोरोना व्हायरस विरोधातील हे युद्ध आहे. प्रशासन तुमच्यासाठी 24 तास काम करत आहे. गेल्या दीड महिन्यापासून लोक एकखारखंच अन्न रोज खात आहे. तरीही कांनी संयम ठेवून म्हाला सहकार्य केले. पण आता त्यांना घराची ओढ लागली असून त्यांची थांबण्याची मानसिकता राहिली नाही. त्यांनी थांबलं पाहिजे, ही विनंती आम्ही पुन्हा करतोय. जाण्याची व्यवस्था होईपर्यंत सहकार्य करा, अशी विनंती बाळासाहेब थोरात यांनी केली.
Balasaheb Thorat | गुजरात, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, कर्नाटक आणि ओडिशा त्यांच्या मजुरांना स्वीकारायला तयार नाही : बाळासाहेब थोरात