याबाबत बोलताना मंत्री गडकरी म्हणाले की, आता सार्वजनिक प्रवाशी वाहतूक पूर्णपणे बंद आहे. येत्या दहा दिवसात सार्वजनिक वाहतूक सुरु होईल. दुकानं देखील हळूहळू सुरु होत आहेत. सार्वजनिक वाहतूक सुरु करण्यासाठी काही गाईडलाईन बनवण्यावर विचार सुरु आहे. आमचा विभाग या गाईडलाईन्सचं पालन करेन, असं देखील गडकरी म्हणाले.
राज्यांसोबत केंद्राच्या समन्वयाबाबत बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, राजकारण आपल्या जागी आणि आता आलेलं हे संकट आपल्या जागी आहे. हे संकट गंभीर आहे. या संकटाचा मुकाबला करण्यासाठी आणि त्यानंतर भारताला महासत्ता बनवण्यासाठी कुठलेही राजकीय मतभेद नाहीत. आम्ही कुणीच सध्या राजकीय मतं व्यक्त करत नाहीत. मी महाराष्ट्रात आहे. दर दोन तीन दिवसांनी मी मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांशी बोलतो. माझ्या काही सूचना असतात त्या दोतो. पंतप्रधान मोदी देखील सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद करत आहेत, असं गडकरी यांनी सांगितलं.
Lockdown | आगामी काळात सार्वजनिक वाहतूक सुविधा सुरु करण्याचा विचार : नितीन गडकरी
महाराष्ट्रातील कोरोना स्थितीवर बोलताना गडकरी म्हणाले की, महाराष्ट्र आणि मुंबई संकटात आहे. या ठिकाणी काही चुका होत असतील, काही तक्रारी असतील तर मी मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांशी बोलतो. आम्ही सगळे मिळून या संकटाशी मुकाबला करण्यासाठी काम करत आहोत. लवकरच आम्ही या संकटातून बाहेर येऊ, असंही गडकरींनी सांगितलं.
मजुरांसाठी आमच्याकडे योजना आहेत. हळूहळू सर्व कामांना सुरु करण्यात येईल. काम सुरु झाली की मजुरांचं स्थलांतर देखील थांबेल, असं गडकरी यांनी म्हटलं आहे. रोजगार देणं ही आमची प्राथमिकता आहे, असंही ते म्हणाले. सरकार उद्योग आणि सर्व सेक्टर्ससाठी मदत करण्याची योजना तयार करत आहे. लवकरच याबाबत देखील घोषणा होईल. सर्व चिंतांचं समाधान होईल, असं गडकरी म्हणाले.
मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याचा सन्मान, मात्र परराज्यातील कामगारांसाठी विशेष ट्रेन सोडणं सध्यातरी अशक्य : नितीन गडकरी