एक्स्प्लोर
औरंगाबादमध्ये केवळ पाच टक्केच कचरा : पालकमंत्री डॉ. दीपक सावंत
कचराप्रश्नी औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी बैठक घेतली, यावेळी त्यांनी हा दावा केला.

औरंगाबाद : शहरात केवळ पाच टक्केच कचरा असल्याचा अजब दावा औरंगाबादचे पालकमंत्री दिपक सावंत यांनी केला आहे. कचराप्रश्नी औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी बैठक घेतली, यावेळी त्यांनी हा दावा केला.
शहर कचऱ्यात असताना तब्बल महिनाभरापासून शहराकडे न फिरकलेल्या पालकमंतत्र्यांनी अखेर शहरात हजेरी लावली. यानंतर पत्रकारांशी बोलताना दीपक सावंत म्हणाले की, “16 फेब्रुवारीपासून शहरात 15 हजार 168 कचरा निर्माण झाला. त्यापैकी 14 हजार 166 टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे. आता, रस्त्याच्या डिव्हायडरवर फक्त पाच टक्के कचरा शिल्लक आहे.”
तसेच, यापुढे शहरात कचरा जाळताना कोणी आढळल्यास कडक कारवाई करण्याचा इशाराही सावंत यांनी दिला आहे. औरंगाबादचे रस्ते कचऱ्याने माखलेले असताना पालकमंत्र्यांनी असा दावा केल्यानं औरंगाबादकरांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे.
दरम्यान, औरंगाबादमध्ये कचरा प्रश्न असताना लोकप्रतिनिधी दोन दिवसाच्या सहलीवर गेले आहेत. यात जिल्ह्यातील खासदार, आमदार, महापौर यांच्यासह पालिकेतील अनेक पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे, त्यांचा मुलगा आणि नगरसेवक सचिन खैरे सहकुटुंब आहेत.
तसेच, औरंगाबाद पूर्वचे भाजप आमदार अतुल सावे, शिवसेना आमदार संजय सिरसाट, काँग्रेसचे आमदार सुभाष झांबड, वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर, महापौर नंदकुमार घोडेले यांचा समावेश आहे. आज हे सर्वजण वाघा बॉर्डरवर जाणार आहेत. तर उद्या अमृतसर असा दोन दिवसांचा दौरा आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
कोल्हापूर
राजकारण
बीड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
