एक्स्प्लोर

Gram Panchayat Election : मोहिते विरुद्ध मोहिते! अकलूज ग्रामपंचायत निवडणुकीत संघर्ष शिगेला, एकमेकांविरोधात तक्रारी

आशिया खंडातली सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या अकलूजमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत मोहिते विरुद्ध मोहिते असा सामना आहे.अकलूज ग्रामपंचायत निवडणुकीत संघर्ष शिगेला पोहोचला आहे. दोन्ही गटाकडून एकमेकांच्या विरोधात तक्रारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

अकलूज : आशिया खंडातली सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या अकलूजमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत मोहिते विरुद्ध मोहिते असा सामना आहे. अकलूज ग्रामपंचायत मध्ये मोहिते विरुद्ध मोहिते संघर्ष शिगेला पोहोचला असून दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात तक्रारी दिल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने अकलूज ग्रामपंचायत निवडणूक हायजॅक केल्याचा आरोप धैर्यशील मोहिते पाटील यांनी केला आहे. तर याउलट जनतेनी ही निवडणूक हाती घेतल्याने यंदा नक्की सत्तांतर घडेल असा दावा धवलसिंह मोहिते पाटील यांनी केला आहे. ही निवडणूक मोहिते पाटील यांनी प्रतिष्ठेची केल्याने कुटुंबातील सर्व सदस्य मतदान केंद्रांवर फिरत असून विरोधी पॅनल उभे केलेले डॉ धवलसिंह व त्यांचे कुटुंबही अकलूजमध्ये फिरत असल्याने वातावरण ढवळून निघाले आहे.

Gram Panchayat Elections : आशिया खंडातील सर्वात मोठी ग्रामपंचायत अकलूजमध्ये पुन्हा मोहिते विरुद्ध मोहिते संघर्ष 

काही नेत्यांच्या नावाने त्या गावाची ओळख पडते असेच एक नाव म्हणजे अकलूज. अकलूज म्हणजे मोहिते पाटील ही ओळख गेल्या 75 वर्षांपासून महाराष्ट्राला आहे. सहकार महर्षी कै शंकरराव मोहिते पाटील यांनी उभा केलेली सहकाराची चळवळ नंतर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी वाढवली आणि थेट राज्याच्या राजकारणातले एक मोठे घराणे अशी ओळख तयार केली.

आशिया खंडातील सर्वात मोठी ग्रामपंचायत अशी ओळख असलेल्या अकलूजच्या लोकसंख्या तब्बल 45 हजारांपेक्षा जास्त असल्याने यावेळी अकलूज नगरपालिका करण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात होता. यासाठी ग्रामपंचायतीवर बहिष्काराची भूमिका सुरुवातीला मोहिते पाटील यांनी घेतली. मात्र विरोधकांशी बैठक फिसकटल्याने पुन्हा ही निवडणूक लागली.

अकलूजच्या राजकीय साठमारीत विजयसिंह मोहिते पाटलांचे लहान बंधू कै प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी मोहिते घरापासून फारकत घेत वेगळी चूल मांडली आणि तेव्हापासून अकलूज मध्ये दोन सत्तास्थाने बनली. यात मुख्य घर असलेल्या विजयदादा यांच्यासोबत बाकीचे भाऊ व कुटुंबीय राहिल्याने सर्व सत्तास्थाने ही त्यांच्याच गटाकडे राहिली आहेत. माजी सहकार मंत्री कै प्रतापसिंह मोहिते पाटील हे सुरुवातीपासूनच डॅशिंग आणि बेधडक स्वभावाचे असल्याने त्यांचा वचक आणि कार्यकर्ते आजही त्यांचे पुत्र डॉ धवलसिंह मोहिते पाटील यांच्यासोबत राहिले आहे. आता विजयदादा यांच्या गटाने भाजपमध्ये प्रवेश केला आणि राज्यात सत्तांतर झाल्याने हे घराणे दुर्लक्षित बनले.

Gram Panchayat Election : ग्रामपंचायत निवडणुकीत लॅपटॉप, पेन ड्राईव्ह, चार्जर, ब्रेड टोस्टर... उमेदवारांना मजेशीर चिन्हं!

याचवेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी धवलसिंह यांना विधानसभेच्यावेळी आपल्या बाजूने बळावल्याने माळशिरस विधानसभेला भाजपाला अगदी निसटता विजय मिळवत अब्रू राखावी लागली होती. आता पुन्हा ग्रामपंचायत निवडणुकीत मोहिते विरुद्ध मोहिते असा संघर्ष उभा राहिला असून विजयदादा यांच्या पॅनल समोर धवलसिंह यांनी नुसते पॅनल उभा केले नाही तर आपल्या पत्नी उर्वशीदेवी याना बिनविरोध निवडून आणत निकालात विजयी सलामी दिली आहे. त्यामुळे विजयदादा यांच्या पॅनलची झालेली सभा विधानसभेची आठवण करून देत असल्याने आता संघर्षाची धार चढू लागली आहे.

Maharashtra Gram Panchayat Election : ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करण्यासाठी लोकप्रतिनिधी सरसावले, देऊ लागले लाखोंच्या ऑफर्स

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray:हा हिंदुत्वाच्या नावाखाली चाललेला भ्रष्टाचार! झाडांच्या कत्तली करून प्रभू रामचंद्रांच्या परस्पर्शाने पुनीत झालेलं तपोवन तुम्ही कोणासाठी मारता आहात? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
हा हिंदुत्वाच्या नावाखाली चाललेला भ्रष्टाचार! झाडांच्या कत्तली करून प्रभू रामचंद्रांच्या परस्पर्शाने पुनीत झालेलं तपोवन तुम्ही कोणासाठी मारता आहात? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
हिंदीत स्टार्स, मराठीत अॅक्टर्स... असं का? दिग्दर्शक संदेश कुलकर्णी म्हणाले, 'मराठीतल्या कलाकारांना खूप रिस्पेक्ट...'
हिंदीत स्टार्स, मराठीत अॅक्टर्स... असं का? दिग्दर्शक संदेश कुलकर्णी म्हणाले...
Eknath Shinde: एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रचाराची न्यू स्टाईल
एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रचाराची न्यू स्टाईल
निवडणूक सुधारणा यादीचा ताण, फक्त 20 दिवसांत तब्बल 26 बूथ लेव्हल ऑफिसरांकडून आयुष्याचा शेवट; तृणमूल शिष्टमंडळ निवडणूक आयोगाच्या भेटीला
निवडणूक सुधारणा यादीचा ताण, फक्त 20 दिवसांत तब्बल 26 बूथ लेव्हल ऑफिसरांकडून आयुष्याचा शेवट; तृणमूल शिष्टमंडळ निवडणूक आयोगाच्या भेटीला
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Jaya Kishori Majha Maha Katta : प्रेरणा देणाऱ्या प्रवचनांच्या अभ्यासाची तयारी जया किशोरी कशा करतात?
Jaya Kishori Majha Mahakatta : अभ्यासात गणित विषय कधीच आवडला नाही - जया किशोरी
Jaya Kishori Majha Maha Katta : राममंदिर निर्माण का महत्वाचं? जया किशोरी नेमकं काय म्हणाल्या?
Jaya Kishori Majha Maha Katta सेल्फ डाऊट आणि तणाव यावर नियंत्रण कसं ठेवावं,काय म्हणाल्या जया किशोरी?
Supreme Court Local Body Election : निवडणुका होणारच, स्थगिती नाही...; महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर मोठा निर्णय

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray:हा हिंदुत्वाच्या नावाखाली चाललेला भ्रष्टाचार! झाडांच्या कत्तली करून प्रभू रामचंद्रांच्या परस्पर्शाने पुनीत झालेलं तपोवन तुम्ही कोणासाठी मारता आहात? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
हा हिंदुत्वाच्या नावाखाली चाललेला भ्रष्टाचार! झाडांच्या कत्तली करून प्रभू रामचंद्रांच्या परस्पर्शाने पुनीत झालेलं तपोवन तुम्ही कोणासाठी मारता आहात? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
हिंदीत स्टार्स, मराठीत अॅक्टर्स... असं का? दिग्दर्शक संदेश कुलकर्णी म्हणाले, 'मराठीतल्या कलाकारांना खूप रिस्पेक्ट...'
हिंदीत स्टार्स, मराठीत अॅक्टर्स... असं का? दिग्दर्शक संदेश कुलकर्णी म्हणाले...
Eknath Shinde: एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रचाराची न्यू स्टाईल
एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रचाराची न्यू स्टाईल
निवडणूक सुधारणा यादीचा ताण, फक्त 20 दिवसांत तब्बल 26 बूथ लेव्हल ऑफिसरांकडून आयुष्याचा शेवट; तृणमूल शिष्टमंडळ निवडणूक आयोगाच्या भेटीला
निवडणूक सुधारणा यादीचा ताण, फक्त 20 दिवसांत तब्बल 26 बूथ लेव्हल ऑफिसरांकडून आयुष्याचा शेवट; तृणमूल शिष्टमंडळ निवडणूक आयोगाच्या भेटीला
3 Indian Territories on Nepal Currency: आता टीचभर नेपाळ सुद्धा आगळीक करु लागला! भारताच्या थेट तीन भागांवर दावा, नोटांवरही वादग्रस्त नकाशा छापला
आता टीचभर नेपाळ सुद्धा आगळीक करु लागला! भारताच्या थेट तीन भागांवर दावा, नोटांवरही वादग्रस्त नकाशा छापला
Sunil Shetty On ABP Majha Maha Katta: 'मराठी भाषेवरून होणारं राजकारण, सक्तीसाठीचा हिंसाचार चुकीचा, पण...'; सुनील शेट्टीचं स्पष्ट मत
'मराठी भाषेवरून होणारं राजकारण, सक्तीसाठीचा हिंसाचार चुकीचा, पण...'; सुनील शेट्टीचं स्पष्ट मत
Virat Kohli MS Dhoni Meet Ind vs SA: विराट कोहली पोहोचला एमएस धोनीच्या घरी; दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या वनडे सामन्याआधी रांचीत काय घडलं?, Video
विराट कोहली पोहोचला एमएस धोनीच्या घरी; दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या वनडे सामन्याआधी रांचीत काय घडलं?, Video
Pune leopard: शिकार करण्यासाठी बिबट्याची थेट घराकडे धाव; आरडाओरडा केल्यानं अनर्थ टळला, सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात घटना कैद
शिकार करण्यासाठी बिबट्याची थेट घराकडे धाव; आरडाओरडा केल्यानं अनर्थ टळला, सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात घटना कैद
Embed widget