एक्स्प्लोर
तळीरामांना झटका, महिन्याला दोनच दारुच्या बाटल्या बाळगता येणार!
अहमदनगर: राज्य सरकारने तरळीरामांना झटका दिला आहे. कारण, आता तळीरामांना दारुच्या महिन्याला दोनचा बाटल्या बाळगता येणार आहेत. राज्याच्या आगामी हिवाळी अधिवेशनात ग्रामरक्षक दल आणि अवैध धंदे रोखण्याचा कायद्याचे बिल मांडण्यात येणार असून याच्या अंतिम मसुद्यावर अण्णा हजारे आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सचिव व्ही.राधा यांच्यात या मसुद्यावरुन प्रदीर्घ काळ चर्चा झाली.
या मसुद्यामध्ये परवानाधारक मद्यसेवन करणाऱ्या व्यक्तींना महिन्यातून दोनच बाटल्या बाळगण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच परवानाधारक परमीट चालकांना दुकान सुरु आणि बंद करण्याची नियमावली करण्यात येणार आहे. याशिवाय परवानाधारकाला ओळखपत्र दाखवल्यानंतरच दारु मिळणार, असे विविध नियम बनवण्यात आले आहेत.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या मसुद्याबाबत काही दुरुस्त्या सुचवल्या असून, या दुरुस्त्यानंतरच हा मसुदा राज्याच्या हिवाळी अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. या बैठकीला राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांसह जिल्हाधिकारी अनिल कवडे हेही उपस्थित होते.
याआधी दारू पिणाऱ्या परवानाधारकास महिन्याला बारा दारूच्या बाटल्या बाळगण्याची परवानगी होती. यावर अण्णा हजारे यांनी आक्षेप घेतला होता. या परवानगीने ग्रामीण भागातील प्रत्येक घरात दारूची दुकाने होतील, अशी भीती अण्णांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त करत यात बदल करण्याची मागणी केली होती.
यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्य उत्पादन शुल्कमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विभागाच्या राज्य सचिव व्ही.राधा यांच्यात बैठकही झाली. त्यानंतर फक्त महिन्यातून दोन बाटल्याच बाळगता येणार असल्याचा निर्णय राज्य शासनाने शुक्रवारी घेतला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement