एक्स्प्लोर
पंकजांची ऑडिओ क्लीप मोडून तोडून दाखवलीः गोविंद केंद्रे

अहमदनगरः पंकजा मुंडे यांची व्हायरल क्लीप तोडून मोडून दाखवण्यात आली असून मुख्यमंत्र्यांना या क्लीपच्या चौकशीच्या मागणीसाठी पत्र लिहिलंय, असा दावा पंकजा मुंडे यांचे समर्थक आणि माजी आमदार गोविंद केंद्रे यांनी केला आहे.
पंकजा मुंडे यांची कथित ऑडिओ क्लिप जशीच्या तशी
दसरा मेळाव्याला पंकजा मुंडे, राजकीय भाषण करणार नाही, तर सामाजिक संदेश देणार असल्याचंही गोविंद केंद्रे यांनी म्हटलंय. त्यामुळे गोविंद केंद्रे यांच्या या मागणीनंतर आता या वादाला नवीन वळण मिळण्याची शक्यता आहे.नामदेव शास्त्री आणि पत्रकारातील संभाषण जसेच्या तसे
पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांशी केलेल्या संभाषणाची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली. या कथित क्लीपमध्ये पंकजांनी नामदेव शास्त्रींविरोधात कायदा हातात घेण्याची भाषा केली आहे. मात्र आमदार केंद्रे यांनी पंकजांचं समर्थन करत ही क्लीप मोडून तोडून दाखवली असल्याचं म्हटलं आहे. संबंधित बातम्याःएखाद्याला फाडून खाईन इतकी ताकद आहे माझीः नामदेव शास्त्री
भगवान गड वादः नामदेव शास्त्रींचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
पंकजा खरं बोलल्या, हा घ्या पुरावा : धनंजय मुंडे
पंकजांचं भाषण होणारच, शास्त्रींना 25 ग्रामपंचायतींचं आव्हान
ती क्लीप ऐकून धक्का बसला, पंकजांनी सत्तेचा दुरुपयोग करु नये: नामदेवशास्त्री
आणखी वाचा























