एक्स्प्लोर

मिरज दंगल : चंद्रकांत पाटलांसह 51 जणांवरील खटला मागे

सांगली : मिरजेत 2009 मध्ये गणेशोत्सवात पोस्टरच्या वादातून दंगल झाली होती. या प्रकरणी 51 जणांविरुद्ध न्यायालयात दाखल करण्यात आलेला एक खटला सरकारने मागे घेतला आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी मिरज न्यायालयात गृह विभागाचा खटला मागे घेण्यात आल्याबाबतचे पत्र सादर केले. यामध्ये महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार सुरेश खाडे, भाजपचे प्रदेश सचिव मकरंद देशपांडे यांच्यासह शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष बजरंग पाटील असे भाजप-शिवसेनेचे कार्यकर्ते असलेल्या 51 जणांविरुद्धचा खटला मागे घेण्यात आला आहे. मिरजेत 2009 मध्ये दंगलीप्रसंगी जमावाने ब्राह्मणपुरीतील गजानन मंगल कार्यालयापासून पोलीस ठाण्यापर्यंत मोर्चा काढला होता. पोलिसांनी श्रीकांत चौकात जमावाला रोखल्यानंतर, जमावाने पोलिसांवर दगडफेक करून रस्त्यावर टायर पेटवले होते. यात पोलिस वाहनासह चौकातील हॉटेल आणि दुकानांवर दगडफेक करून 50 ते 60 हजारांचे नुकसान व पोलीस कर्मचाऱ्यांना जखमी केल्याप्रकरणी पोलिसांनी भाजप, शिवसेनेच्या 51 कार्यकर्त्यांवर मिरज न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्याच्या सुनावणीप्रसंगी संशयितांचे वकील वासुदेव ठाणेदार यांनी शासनाने हा खटला मागे घेतल्याचे पत्र मंगळवारी हजर केल्यानंतर न्यायालयाने सुनावणी रद्द केली. दरम्यान, अन्य खटल्यावर अद्याप निर्णय झाला नाही. पोलिसांनी त्यावेळी दंगल प्रकरणी 37 गुन्हे दाखल करून दोन्ही गटांच्या सुमारे 600 जणांना अटक केली होती. तसेच दंगलप्रकरणी सर्व संशयितांविरूद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. दंगलीत निरपराध तरुणांवर दाखल करण्यात आलेले खटले मागे घेण्याची मागणी आमदार सुरेश खाडे यांनी शासनाकडे केली होती. मात्र, आमदार खाडे, महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे संशयित असलेला दंगलीचा एकच खटला शासनाने मागे घेतला आहे. दंगलप्रकरणी पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केलेल्या अन्य खटल्यांची सुनावणी रखडल्याने त्यांचा अद्याप निर्णय झालेला नाही

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जुलै 2026 | सोमवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जुलै 2026 | सोमवार
Nashik Crime News: पतीनं पत्नी अन् चिमुकल्याला निर्दयीपणे संपवलं; स्वतःही घेतलं विष, रूग्णालयात मृत्यूशी झुंज, नाशिकमधील हादरवणारी घटना
पतीनं पत्नी अन् चिमुकल्याला निर्दयीपणे संपवलं; स्वतःही घेतलं विष, रूग्णालयात मृत्यूशी झुंज, नाशिकमधील हादरवणारी घटना
Rohini Khadse: अरे मोदीजींच्या चमच्या, देशाची वाट लावायला देश काय तुमच्या बापाची जाहगीर वाटली काय?; भाजपच्या अतुल भातखळकरांच्या टीकेला रोहिणी खडसेंच तिखट प्रत्युत्तर
अरे मोदीजींच्या चमच्या, देशाची वाट लावायला देश काय तुमच्या बापाची जाहगीर वाटली काय?; भाजपच्या अतुल भातखळकरांच्या टीकेला रोहिणी खडसेंच तिखट प्रत्युत्तर
Samruddhi Mahamarg Accident : मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर

व्हिडीओ

Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report
J P Nadda Meeting With CJP : सरकार-आंदोलक पहिली बैठक, नड्डांकडे मागण्यांचं निवेदन | Special Report
NEET Result 2026 Pune Krushna Hundekari : नीट परिक्षेच्या निकालात गडबड; पुण्यातील विद्यार्थिनीचे आरोप
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
CJP Protest : विद्यार्थी सोडाच... तीन टर्म आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
विद्यार्थी सोडाच... तीन टर्म आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
Share Market : सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
Amit Shah : CJP च्या आंदोलनामुळं नवी दिल्लीत बैठकांचा धडाका, अमित शाहांची धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबत बैठक, इतर दोन मंत्र्यांची हजेरी 
अभिजित दिपकेच्या सीजेपीच्या आंदोलनाचा परिणाम, दिल्लीत बैठकांचा धडका, अमित शाहांच्या बैठकीत तीन मंत्र्यांची उपस्थिती  
Delhi Jantar Mantar Protest: 'दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांना केसांना धरुन खेचलं, लाठीमारात 40-50 विद्यार्थ्यांची डोकी फोडली', सीजेपीचा गंभीर आरोप
'दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांना केसांना धरुन खेचलं, लाठीमारात 40-50 विद्यार्थ्यांची डोकी फोडली', सीजेपीचा गंभीर आरोप
Yogendra Yadav : संसदेकडे जाणारे सर्व रस्ते गर्दीने भरुन गेलेत, लाखोंचा जमाव पाहून योगेंद्र यादव भारावले, म्हणाले, 'हा ऐतिहासिक क्षण...'
50 वर्षांनंतर शिक्षण आणि बेरोजगारीच्या मुद्यावर युवक रस्त्यावर उतरले, योगेंद्र यादव व्हिडिओ शेअर करत म्हणाले...
जंतरमंतरवरील आंदोलकांना करंट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप; अनेकांना भर आंदोलनात करंटचे झटक्यावर झटके, पोलिसांनी आरोपाचं उत्तर सुद्धा दिलं नाही
जंतरमंतरवरील आंदोलकांना करंट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप; अनेकांना भर आंदोलनात करंटचे झटक्यावर झटके, पोलिसांनी आरोपाचं उत्तर सुद्धा दिलं नाही
Samruddhi Mahamarg Accident : मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
Embed widget