एक्स्प्लोर
Advertisement
बालाजी तांबे यांच्याविरोधात गुन्हा
अहमदनगर : लेखक बालाजी तांबे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 'आयुर्वेदीय गर्भसंस्कार' या पुस्तकात पुत्रप्राप्तीसाठी उपाय सुचवून त्याचा प्रचार आणि प्रसार केल्याने, प्रकाशक आणि तांबेंविरोधात प्रसवपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याचा (पीसीपीएनटीडी) भंग केल्याप्रकरणी संगमनेर न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा गुन्हा सिद्ध झाल्यास बालाजी तांबेंसह प्रकाशकांना तीन वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
सामाजिक कार्यकर्ते गणेश बोऱ्हाडे यांनी नोव्हेंबर 2015 मध्ये अहमदनगर जिल्हा शल्यचिकित्सांकडे पुस्तकाचे लेखक, प्रकाशक आणि विक्रेत्यांविरोधात तक्रार केली होती. त्यावर संबंधितांकडून खुलासे मागवण्यात आले होते.
आयुर्वैद्य डॉ. बालाजी तांबेंना कोर्टात हजर राहण्याचे आदेश
हा विषय आयुर्वेदशास्त्राशी संबंधित असल्याने त्याबाबत तज्ज्ञांचे मत घेण्याचा निर्णय झाला. त्यानुसार हे प्रकरण महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडे सोपवण्यात आलं. विद्यापीठाने तांबेलिखित पुस्तकाचा अभ्यास करुन अहवाल देण्यासाठी समिती नेमली होती. या समितीच्या अहवालानुसार बालाजी तांबे यांनी पीसीपीएनडीटी कायद्याचा भंग केल्याच प्रथमदर्शनी सिद्ध झालं. त्यामुळेच त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
Advertisement