एक्स्प्लोर
गोमांस विक्रीचा आरोप करत वाशिममध्ये तीन व्यापाऱ्यांना मारहाण
वाशिम : वाशिममधल्या शिरपूरमध्ये तीन व्यापाऱ्यांवर गोमांस विकत असल्याचा आरोप करत गोरक्षकांनी त्यांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. वाशिममधल्या राजूरा तालुक्यात 26 मे रोजी ही घटना घडली आहे.
नरेंद्र मोदींनी स्वयंघोषित गोरक्षांना वचक बसावा म्हणून अशा गोरक्षकांना धारेवर धरलं होतं. तरीही या गोरक्षकांचा उन्माद काही थांबायला तयार नाही. शिरपूरमध्ये तीन व्यापारी गावात गोमांस विकत असल्याची माहिती मिळाल्यानंतर तथाकथित 9 गोरक्षकांनी या व्यापाऱ्यांना मारहाण केली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
दरम्यान या 9 गोरक्षकांसमवेत तीनही व्यापाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गोरक्षकांना कोर्टात हजर केल्यानंतर त्यांची जामिनावर सुटकादेखील करण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement