एक्स्प्लोर
Advertisement
एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 1 मेपूर्वी वेतननिश्चिती करार होणार!
1 मेच्या अगोदरच वेतननिश्चितीचा करार केला जाईल, अशी घोषणा दिवाकर रावतेंनी केली. सर्व एसटी कामगार संघटनांच्या बैठकीत यावर तोडगा निघाला.
मुंबई : परिवहन मंत्री दिवाकर रावतेंनी एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर दिली आहे. 1 मे रोजी एसटी कर्मचारी कामगार दिन साजरा करतील. 1 मेच्या अगोदरच वेतननिश्चितीचा करार केला जाईल, अशी घोषणा दिवाकर रावतेंनी केली.
सर्व एसटी कामगार संघटनांच्या बैठकीत यावर तोडगा निघाला. दिवाकर रावतेंच्या या आश्वासनानंतर एसटी कामगार संघटनांनीही समाधान व्यक्त केलं. गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांकडून वेतननिश्चितीची मागणी केली जात आहे.
वेतनवाढ संदर्भात मान्यताप्राप्त संघटना असलेल्या एसटी कामगार संघटनेने ऐन दिवाळीच्या हंगामात चार दिवसांचा संप पुकारून कर्मचाऱ्यांच्या पदरी निराशाच आली. इतकंच नाही तर एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संघटनांच्या भूमिकांबाबत असलेला असंतोष पाहता, आज झालेल्या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या हिताचा विचार करता जे पदरात पडेल ते अगोदर पदरात पाडून घेण्याचा सर्वच संघटनांचा प्रयत्न होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
राजकारण
निवडणूक
निवडणूक
Advertisement