Gondia News: सिलेंडरमध्ये गॅस भरत असताना मोठा स्फोट; आगीत दोन किराणा दुकान जळून खाक
Gondia News: गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील सौदळ येथील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या दोन किराणा दुकानाला भीषण आग लागलीय. या आगीत दोन किराणा दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे.
Gondia News : गोंदियाच्या (Gondiya) अर्जुनी तालुक्यातील सौदळ येथील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या दोन किराणा दुकानाला भीषण आग (Fire) लागलीय. या आगीत दोन्ही किराणा दुकाने आगीत जळून खाक झाल्याने या दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे. प्राप्त माहितीनुसार दुकानदार मोठ्या गॅस सिलेंडरमधून छोट्या सिलेंडरमध्ये गॅस भरत असताना ही घटना घडल्याची माहिती पुढे आली आहे. या आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे. अग्निशमन दलाच्या वतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कसोशीचे प्रयत्न सुरू आहे. या आगीत अद्याप कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी, दोन किराणा दुकानाचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.
आगीत दोन किराणा दुकान जळून खाक
गोंदिया जिल्ह्याच्या सौदळ येथील राष्ट्रीय महामार्गालगत झालेल्या या आगीच्या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना आज 8 मार्चच्या दुपारच्या सुमारास घडली. अल्पावधीतच आगीने संपूर्ण दुकानावर ताबा मिळवला आणि आगीचा प्रचंड मोठा लोट दूरवर पसरला. परिणामी, परिसरात अचानक काळे ढग सदृश्य परिस्थिति तयार झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सोबतच दुकानात असलेल्या सिलेंडरचा स्फोट झाल्याने परिसरात मोठा आवाज झाला. विशाल शहारे आणि छत्रुघन ब्राह्मणकर या दोघांचे हे दोन दुकान असून प्राप्त माहिती नुसार, दुकानदार मोठ्या गॅस सिलेंडर मधुन छोट्या सिलेंडर मध्ये गॅस भरत असताना अचानक हा स्फोट झाल्याचे समोर आले आहे. सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी झाली नसली तरी अचानक झालेल्या या सिलेंडर स्फोटच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सध्याघडीला आगीवर नियंत्रण मिळण्याचे प्रयत्न अग्निशमन दलाच्या वतीने घेण्यात येत असून घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहे.
....अन् थेट कार नाल्यात कोसळली, चालकाचा आगीत होरपळून मृत्यू
नागपूर-चंद्रपूर महामार्गावरील कोंढा नाल्यावरील एका कारचा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. यात कारचालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार सरळ भद्रावती शहराजवळ असलेल्या कोंडा नाल्यात जाऊन कोसळली. हा अपघात इतका भीषण होता की यात कारने अचानक पेट घेतल्याने यात असलेल्या एका अज्ञात कार चालकाचा होरपळून मृत्यू झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार ही घटना काल 7 मार्चच्या मध्यरात्रीच्या सुमारस घडल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. आज सकाळी या घटनेची माहिती भद्रावती पोलिसांनी मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठत पुढील कारवाई सुरू केली असता, अर्धवट अवस्थेत जळालेली कार आणि एक मृतदेह आढळून आला आहे.
रात्रीच्या सुमारास झालेल्या या कार अपघातात कार नाल्यात कोसळल्यावर कार ने पेट घेतला असावा आणि कारचालकाला बाहेर निघता न आल्याने त्याचा जळून मृत्यू झाला असावा, अशी शक्यता भद्रावती पोलिसांनी व्यक्ति केली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या