एक्स्प्लोर
Advertisement
गोंदियाच्या बाजारात 'आय लव्ह पाकिस्तान' छापलेले फुगे
शहरात कुठलेही चिमुकले किंवा व्यापारी 'आय लव्ह पाकिस्तान' लिहिलेले फुगे विकताना आढळल्यास पोलिसांना माहिती द्यावी असं आवाहन नागरिकांना केलं आहे.
गोंदिया : गोंदिया शहरात 'पाकिस्तान जिंदाबाद' लिहिलेल्या फुग्यांची विक्री होत असल्याचं उघडकीस आलं आहे. नवरात्रौत्सवात शहरातील विविध दुर्गा मंडपांजवळ युवा सेनेच्या तरुणांना लहान मुलं फुगे विकताना आढळली.
'पाकिस्तान जिंदाबाद', 'आय लव्ह यू पाकिस्तान' असं लिहिलेले फुगे विकले जात होते. विक्रेत्या चिमुरड्यांकडून सर्व फुगे युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी विकत घेतले आणि गोंदिया शहर पोलिसांच्या स्वाधीन केले.
फुगे विकणाऱ्या मुलांकडे याबाबत विचारणा करुन त्यांना सोडून देण्यात आलं. मात्र बाजारात हे फुगे नेमके आले कुठून, याचा शोध पोलिस घेत आहेत. गोंदिया शहर पोलिसांनी शहरातील फुगे व्यापाऱ्यांना बोलावून फुग्यांवरील लोगो तपासून पाहण्याच्या सूचना दिल्या आहेत. अन्यथा कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी व्यापाऱ्यांना दिला आहे.
शहरात कुठलेही चिमुकले किंवा व्यापारी अशा पद्धतीचे फुगे विकताना आढळल्यास त्यांच्याविषयी माहिती द्यावी असं आवाहन पोलिसांनी नागरिकांना केलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
क्राईम
व्यापार-उद्योग
Advertisement