Gold Rate Today : ऐन लग्नसराईत सोन्याच्या किंमतीत विक्रमी वाढ; प्रतितोळा दर तब्बल...
सोन्याने बुधवारी म्हणजेच 5 एप्रिलला नवा विक्रम केला. 10 ग्रॅम सोन्याची किंमत पहिल्यांदाच 61 हजारांवर जाऊन पोहोचली तर चांदीनेही 74 हजारांचा टप्पा पार केला.
Gold Rate Today : सोन्याने बुधवारी म्हणजेच 5 एप्रिलला नवा विक्रम केला. 10 ग्रॅम सोन्याची किंमत पहिल्यांदाच 61 हजारांवर जाऊन पोहोचली तर चांदीनेही 74 हजारांचा टप्पा पार केला. आज (6 एप्रिल) सोन्याचा दर 60 हजार 850 प्रती तोळा आहे तर चांदीचा दर 76 हजार 200 आहे. ऐन लग्नसराईच्या दिवसांत सोन्यांच्या किंमतींनी साठी गाठल्यामुळे सामान्य नागरिकांना मोठा फटका बसला आहे. येत्या काळात सोन्याच्या किंमतीत वाढ होणार असून 71 हजारांवर सोन्याच्या किंमती जाण्याची शक्यता आहे.
सोन्याचे दर गेल्या अनेक महिन्यांपासून वाढत चालले आहेत. मात्र दर वाढले असले तरी सोने खरेदीमध्ये फरक पडलेला नाही. ग्राहकांचा तितकाच प्रतिसाद सोने खरेदीला आहे. पण या वेळी सोन्याने नवीन विक्रम केला. 5 एप्रिलला सर्वाधिक सोन्याचे दर बघायला मिळाले आहेत जगातील मार्केटमध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे. स्टॉक मार्केटची घसरण झाली आहे. त्यात रशिया युक्रेन युद्धही झालं आहे. त्यामुळे सोन्यांच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. मात्र गुंतवणूक म्हणून सोन्याची खरेदी करावी, असं पी.एन.जी ज्वेलर्सच्या सौरभ गाडगीळ यांनी सांगितलं आहे.
सोन्यातील गुंतवणुकीबाबत तज्ज्ञ काय सांगतात?
सराफा बाजार कायम गजबजलेला असतो. मात्र सोन्याच्या दरात विक्रमी वाढ झालेली असताना देखील लोक सोने खरेदी करताना दिसत आहेत. सध्या लग्नाचा काळ सुरु आहेत त्यामुळे अनेक लोक सोनं खरेदी करताना दिसत आहेत. सोन्याच्या किंमती वाढत आहे. त्यासोबतच विक्रीत देखील वाढ होत आहे. अनेक नागरिक सोनं खरेदी करताना दिसत आहेत. सोन्यात गुंतवणूक करतानाही दिसत आहेत. तुम्हाला जरी सोन्यात गुंतवणूक करणे आवडत असले तरी तुम्ही त्यात मर्यादित गुंतवणूक केली पाहिजे, असं काही तज्ञांचे मत पडले. कर्ज काढून सोने घेण्यात अर्थ नाही, पण असलेले पैसे सोन्यात गुंतवले तर नक्कीच फायदा होईल, असंही तज्ञ सांगतात. सोन्याचे आपल्याकडे वेगळे महत्त्व आहे. फक्त गुंतवणूक नाही तर सोन्याच्या घेतलेल्या प्रत्येक गोष्टीशी आपली भावना जोडलेली असते आणि त्यामुळेच ग्राहक सोने खरेदीकडे वळतात.
वर्षअखेरीस सोन्याचा दर प्रतितोळा 70 हजारांवर जाण्याचा अंदाज
सोन्याचे नवीन विक्रम केला. 61,000 इतका दर गाठला, हा आत्तापर्यंतचा सर्वाधिक दर आहे पण भारतात आपण सोन्याकडे फक्त गुंतवणूक म्हणून बघत नाही तर ते स्त्रीधन असते. म्हणून ग्राहक अजूनही सोने खरेदीला पसंती देतात मात्र या वर्षाच्या शेवटपर्यंत दर 70,000 प्रती तोळा होईल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे तेव्हा ग्राहक कसा प्रतिसाद देतात हे बघणे महत्वाचे असेल.