एक्स्प्लोर
दसऱ्याच्या शुभमुहूर्ताला जळगावात सोने खरेदीसाठी गर्दी
साडेतीन मुहूर्तापैकी महत्वाचा अशा दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आज जळगावात सोने खरेदीसाठी महिलांनी गर्दी केली आहे.

जळगाव : साडेतीन मुहूर्तापैकी महत्वाचा अशा दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आज जळगावात सोने खरेदीसाठी महिलांनी गर्दी केली आहे. त्यामुळे सकाळपासूनच सराफ पेढ्यांवर मोठी उलाढाल दिसून येत आहे. साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सोनं खरेदीसाठी आज जळगावातील सराफा पेढ्यांवर नागरिकांची विशेष करुन महिलांची गर्दी झाली आहे. पण शुभ मुहूर्तावरच्या सोने खरेदीला जीएसटी आणि सरकारच्या नियमांनी थोडी नजर लावली आहे. 50 हजारावरील सोने खरेदीसाठी पॅनकार्ड किंवा तत्सम ओळखपत्र बंधनकारक केल्यानं व्यापारी आणि खरेदीदार दोघांमध्येही नाराजी आहे. याचा परिणाम आजच्या एकूण व्यवहारांवर होण्याची भीती सराफा व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
रायगड
व्यापार-उद्योग
भारत
व्यापार-उद्योग























