एक्स्प्लोर
विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या शिक्षकाची धुलाई, पोलीस ठाण्यापर्यंत धिंड
विद्यार्थिनीला खासगी शिकवणीसाठी बोलावून तिची छेड काढणाऱ्या शिक्षकाची विद्यार्थिनीच्या पालकांनी चांगलीच धुलाई केली आहे. त्यानंतर पालकांनी त्या शिक्षकाच्या अंगावरचे कपडे उतरवून त्याची पोलीस ठाण्यापर्यंत धिंड काढली.

बीड : केज शहरात विद्यार्थिनीला खासगी शिकवणीसाठी बोलावून तिची छेड काढणाऱ्या शिक्षकाची विद्यार्थिनीच्या पालकांनी चांगलीच धुलाई केली आहे. पालक इतक्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी त्या शिक्षकाच्या अंगावरचे कपडे उतरवून त्याची पोलीस ठाण्यापर्यंत धिंड काढली. याप्रकरणी त्या शिक्षकासह त्याला मदत करणाऱ्या एका विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिद्धेश्वर रामराव माने असे या शिक्षकाचे नाव असून तो केज शहरातील कानडी रस्त्यावर फिनिक्स नावाचा खासगी चालवतो. सिद्धेश्वरने सोमवारी सकाळी एका विद्यार्थिनीला फोन करून परीक्षा असल्याची थाप मारली आणि तिला खासगी शिकवणीसाठी क्लासेसवर बोलावून घेतले. शिक्षकाच्या फोननंतर ती विद्यार्थिनी शिकवणीसाठी क्लासला गेली. तिथे शिकवणीच्या वर्गात सिद्धेश्वर आणि केवळ एकच विद्यार्थी होता. त्या दोघांनी तिची छेड काढली. त्यानंतर विद्यार्थिनीने घरी येऊन घडलेला सर्व प्रकार तिच्या पालकांना सांगितला. शिक्षकाने आपल्या मुलीची छेड काढल्याचे ऐकून संतापलेल्या पालकांनी सदर शिक्षकाच्या अंगावरील कपडे काढून चांगलीच धुलाई केली. त्यानंतर त्या शिक्षकाची क्लासेसपासून पोलीस ठाण्यापर्यंत धिंड काढली. विद्यार्थिनीच्या पालकांनी शिक्षकाला पोलिसांच्या ताब्यात दिले असून पोलिसांनी या शिक्षकावर आणि त्याच्यासोबत असणाऱ्या विद्यार्थ्यावर गुन्हा नोंदवला आहे.
Before You Go
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र






















