एक्स्प्लोर
Advertisement
पाच वर्षांपूर्वी फसवणारा प्रियकर 'तिला' बँकेच्या रांगेत सापडला...
नाशिक : नोटाबंदीच्या निर्णयानंतर सोशल मीडियावर अनेक विनोद व्हायरल झाले आहेत. व्हॉट्सअॅपवरचा जोक शोभावी अशी एक घटना नाशकात प्रत्यक्षात घडली आहे. पाच वर्षांपूर्वी फसवून पसार झालेला प्रियकर तरुणीला बँकेच्या रांगेत सापडला आहे.
प्रेयसीला प्रेमाच्या आणाभाका घेऊन एक प्रियकर पाच वर्षांपूर्वी बेपत्ता झाला होता. मात्र इतक्या वर्षांनी तिला तो बँकेच्या लायनीत सापडला. ही सत्य घटना आहे नाशिकमधली.
सातपूरमधल्या एका बँकेच्या रांगेत एक तरुण उभा राहिला. यागोयोगाने त्याच रांगेत त्याच्या प्रेमाला बळी पडलेली कोणे एके काळची प्रेयसी उभी होती. आपल्याला फसवून परागंदा झालेला तरुण पाहून तिने रांग सोडली आणि कुटुंबीयांना फोन केला.
तात्काळ तिचे कुटुंबीय बँकेजवळ पोहचले आणि त्याला यथेच्छ चोप दिला. इतकंच नाही तर तरुणावर बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यासाठी त्यांनी थेट पोलिस ठाणे गाठलं.
नोटाबंदीच्या निर्णयाचा फायदा किंवा अडचणी अनेक जण सांगत आहेत. या तरुणीच्या कुटुंबीयांना मात्र त्याचा चांगलाच परिणाम जाणवला असावा.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement