एक्स्प्लोर
साताऱ्यातील अजिंक्यतारा किल्ल्यावरुन तरुणीची आत्महत्या

सातारा : साताऱ्यात अजिंक्यतारा किल्ल्यावरुन उडी घेत एका तरुणीनं आत्महत्या केली आहे. तरुणीनं आत्महत्या का केली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र रागामध्ये तरुणीनं आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अजिंक्यतारा किल्ल्यावरुन आत्महत्या करणाऱ्या तरुणीचं नाव सायली पवार आहे. ही तरुणी एमपीएससीचा परिक्षेची तयारी करत होती. काल संध्याकाळी अचानक तरुणी घरातून गायब झाली. त्यानंतर रागात ही तरुणी अजिंक्यतारा किल्ल्याच्या दिशेनं जाताना पाहिल्याचं काही लोकांनी तरुणीच्या वडिलांना सांगितलं. तसंच अजिंक्यताराच्या कड्याजवळून गेलेली तरुणी संध्याकाळनंतर दिसलीच नाही. दरम्यान साताऱ्यातील सह्याद्री ट्रेकर्स ग्रुपच्या मदतीनं तरुणीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. तरुणीच्या आत्महत्येचं कारण अस्पष्ट आहे.
Before You Go
Shiv Sena PC On Pradeep Purnekar Case :एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र





















