एक्स्प्लोर
मनमाडमध्ये प्रियकराच्या छळाला कंटाळून तरुणीची आत्महत्या

नाशिक : प्रियकराकडून होत असलेल्या छळाला कंटाळून एका तरुणीने आत्महत्या केली. मालेगावमधील शिवाजीनगर इथे बुधवारी ही घटना घडली. मोनाली खरे असं मृत तरुणीचं नाव आहे. मोनालीचे जय शेलार या तरुणाशी प्रेमसंबंध होते. मात्र प्रियकराकडून होत असलेल्या छळाला ती कंटाळली होती. मोनाली बुधवारी दुपारी परीक्षेचा फॉम भरण्यासाठी जाते, असं सांगून घरातून बाहेर पडली. मात्र जाजूवाडीत जाऊन तिने विष प्राशान केलं. यानंतर ती काही काळ ती तिथेच पडून होती. एका रिक्षाचालकाच्या हे निदर्शनास आलं आणि त्याने तिला रुग्णालयात दाखल केलं. मात्र त्याआधीच तिचा मृत्यू झाला होता. दरम्यान, मोनालीच्या आईने प्रियकर जयवर विष पाजून मारल्याचा आरोप केला आहे. आईच्या तक्रारीनंतर जयवर वडनेर खाकुर्डी पोलिसात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली. पाहा व्हिडीओ
आणखी वाचा























