एक्स्प्लोर

राष्ट्रवादीतील अनेक जण दुपारी शपथ घेतात आणि रात्री मला फोन करतात : गिरीश महाजन

नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना महाजन म्हणाले की, सध्या माझ्याकडे 50 च्या वर लोकांची यादी आहे, जे भाजप प्रवेशासाठी इच्छुक आहेत. माझा निम्मा दिवस ही यादी बघण्यातच जात आहे. माजी आमदारांसोबत आजी आमदारही या यादीत आहेत असेही महाजन यांनी सांगितले आहे.

नाशिक : 'आम्ही राष्ट्रवादी सोडून जाणार नाही', अशी शपथ राष्ट्रवादीला आता घ्यावी लागत आहे. आज अशी शपथ घेण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. मात्र राष्ट्रवादीतले अनेक जण दुपारी शपथ घेतात आणि रात्री मला फोन करतात, असा दावा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. सध्या माझा निम्मा दिवस भाजप प्रवेशाची यादी पाहण्यातच जात आहे, असेही महाजन म्हणाले. नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना महाजन म्हणाले की, सध्या माझ्याकडे 50 च्या वर लोकांची यादी आहे, जे भाजप प्रवेशासाठी इच्छुक आहेत. माझा निम्मा दिवस ही यादी बघण्यातच जात आहे. माजी आमदारांसोबत आजी आमदारही या यादीत आहेत असेही महाजन यांनी सांगितले आहे. सोबतच मला मुख्यमंत्री होण्याची अजिबात इच्छा नाही, मी मुख्यमंत्रिपदाच्या रेसमध्येही नाही, असेही गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले. दरम्यान, महाजनादेश यात्रेला खूप चांगला प्रतिसाद मिळत असून ही यात्रा 7-8 जळगावला येणार आहे. तसेच नाशिकला या यात्रेच्या समारोपाला अमित शाह किंवा नरेंद्र मोदी येतील, असेही ते म्हणाले. यावेळी नाशिकच्या पूरस्थितीबद्दल बोलताना ते म्हणाले की, नाशिकमध्ये अतिवृष्टी सुरु असून प्रशासन सर्व काळजी घेत आहे. चांदोरी, सायखेडा तसेच काझीगडीवरील नागरिकांना स्थलांतरित केले आहे. पाऊस थांबत नसल्याने वेळ पडल्यास आम्ही मिल्ट्रीलाही पाचारण करू, असे महाजन म्हणाले. मुंबईत अनेक ठिकाणी रेल्वेसेवा बंद आहे, धोका नको म्हणून आम्ही काळजी घेत आहोत. मुंबईतून पाणी बाहेर जात नसल्याने परिस्थिती अवघड झाली आहे, असं ते म्हणाले. जायकवाडी 100 टक्के भरेल असं वाटत आहे, 3 दिवसात 30 टीएमसी पाणी तिकडे सोडण्यात आले आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Blog Updates: आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा फटका आता भारतीय स्वयंपाक घराला
Maharashtra Live Blog Updates: आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा फटका आता भारतीय स्वयंपाक घराला
Accident News : भीषण अपघात! खाटू श्याम बाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; नागपुरातील एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच अंत, सहा जण गंभीर
काळाचा घाला! खाटू श्याम बाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांचा भीषण अपघात; नागपूरच्या एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच अंत, सहा जण गंभीर
धक्कादायक! दुचाकीस्वारांचा वाद सोडवण्यासाठी गेलेल्या वाहतूक पोलिसावर हल्ला; आरोपी फरार
धक्कादायक! दुचाकीस्वारांचा वाद सोडवण्यासाठी गेलेल्या वाहतूक पोलिसावर हल्ला; आरोपी फरार
पायी परिक्रमा करत असलेल्या जैन मुनींचा अपघातात मृत्यू, मुंबई-अहमदाबाद महामार्गावर घडली घटना
पायी परिक्रमा करत असलेल्या जैन मुनींचा अपघातात मृत्यू, मुंबई-अहमदाबाद महामार्गावर घडली घटना

व्हिडीओ

Politics On Gas Shortage : गॅस सिलिंडर टंचाईविरोधात काँग्रेस आक्रमक Special Report
Special Report Bomb Threat to Assembly : धमकीचा बॉम्ब, अफवांमुळे घाम! Special Report
Politics On Marathi Language : मराठीचा मुद्दा, मुनगंटीवारांचा गुद्दा Special Report
Queue For LPG Cylinder : मुबलकसाठा आणि रांगेतला आटापिटा, नागरिक चिंतेत Special Report
Special Rpeort Cockroach Spray On Fish : माशांवर लाल हिट, कारवाईचा स्प्रे कधी? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Israel-Iran War : इस्रायल- इराण युद्धादरम्यान अमेरिकेला जबर धक्का: लष्करी विमान KC-135 कोसळलं, शोध मोहीम सुरू, अपघाताचे कारण काय?
इस्रायल- इराण युद्धादरम्यान अमेरिकेला जबर धक्का: लष्करी विमान KC-135 कोसळलं, शोध मोहीम सुरू, अपघाताचे कारण काय?
PM Kisan : पीएम किसानचे 2000 रुपये काही तासांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येणार, 22 व्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार, महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार? 
पीएम किसानचे 2000 रुपये काही तासांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येणार,महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार? 
Inflation : महागाई वाढली, फेब्रुवारीची आकडेवारी जाहीर, ग्रामीण भागात की शहरात महागाईचा सर्वाधिक फटका?
महागाई वाढली, फेब्रुवारीची आकडेवारी जाहीर, ग्रामीण भागात की शहरात महागाईचा सर्वाधिक फटका?
BLOG : गॅसटंचाई आणि राजकारणाचा इतिहास, इंदिरा गांधींनीही केलाय स्फोटक परिस्थितीचा सामना
BLOG : गॅसटंचाई आणि राजकारणाचा इतिहास, इंदिरा गांधींनीही केलाय स्फोटक परिस्थितीचा सामना
Iran : आखाती देशांवरील हल्ले थांबणार नाहीत, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार, इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांचा इशारा
शहीद झालेले जवान, लहान मुलांच्या मृत्यूचा बदला घेणार, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार : मोजतबा खामेनी
EPFO : 7 कोटी खातेदारांच्या पीएफ खात्यात व्याजाची रक्कम कधी जमा होणार?  ईपीएफओकडून व्याज कसं मोजलं जातं? जाणून घ्या
पीएफ खात्यात व्याजाची रक्कम कधी जमा होणार?  ईपीएफओकडून व्याज कसं मोजलं जातं? जाणून घ्या
सातारा जिल्ह्यातील ह्रदयद्रावक घटना; पोहोण्यासाठी कालव्यात उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरुन मृत्यू
सातारा जिल्ह्यातील ह्रदयद्रावक घटना; पोहोण्यासाठी कालव्यात उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरुन मृत्यू
जय पवार हे तुमचाच भाऊ आहे, टेलिफोन करायला पण वेळ नाही का? सुधीर मुनगंटीवारांचा रोहित पवारांवर पलटवार
जय पवार हे तुमचाच भाऊ आहे, टेलिफोन करायला पण वेळ नाही का? सुधीर मुनगंटीवारांचा रोहित पवारांवर पलटवार
Embed widget