एक्स्प्लोर
कारखान्यासाठी गिरीश महाजनांनी 5 एकर जमीन लाटली : काँग्रेस
![कारखान्यासाठी गिरीश महाजनांनी 5 एकर जमीन लाटली : काँग्रेस Girish Mahajan Cheats Farmers Grab 5 Acres Land For Factory Congress कारखान्यासाठी गिरीश महाजनांनी 5 एकर जमीन लाटली : काँग्रेस](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/04/15180753/girish-mahajan-new-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
जळगाव : विविध आरोपांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यांच्यापाठोपाठ आता राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी पाच एकर जमीन लाटल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील मानपूर गावातील पाच एकर जमीन गिरीश महाजन यांनी 2002 मध्ये कारखान्यासाठी केली होती. मात्र या जमिनीचा उल्लेख प्रतिज्ञापत्रात न केल्याने महाजनांनी निवडणूक शर्तींचा भंग केल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.
या कारखान्यात शेतकऱ्यांना नोकरु देऊ असं आश्वासन ही जमीन खरेदी करताना गिरीश महाजन यांनी दिलं होतं. पण प्रत्यक्षात मागील 16 वर्षात या पाच एकर जमिनीवर ना कारखाना उभा राहिला, ना शेतकऱ्यांना रोजगार मिळाला, असंही काँग्रेसने म्हटलं आहे.
या जमीन खरेदीत फसवणूक झाल्याचा दावा तिथले शेतकरी करत असून ही जमीन परत करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
दरम्यान, गिरीश महाजन यांनी सर्व आरोप फेटाळत ही जमीन शेतकऱ्यांना परत देण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
मुंबई
बॉलीवूड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)