एक्स्प्लोर
शिखर शिंगणापूरच्या घाटात कॉलेज तरुणीवर सामूहिक बलात्कार
अकलूज : सोलापूर जिल्ह्यातील अकलूजमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. या प्रकरणी पोलिसांनी सुनील मानेच्या नावाच्या आरोपीला अटक केली आहे.
पीडित तरुणी आणि तिचा मित्र दुचाकीवरुन 8 मार्च रोजी शिखर शिंगणापूरला दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन परतत असताना, आरोपी सुनीलनं साथीदाराच्या मदतीनं त्या दोघांना धमकावलं. पीडित तरुणी आणि तिच्या मित्राचं मोबाईलमध्ये शुटिंग करत व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली, आणि तरुणीवर बलात्कार केला.
विशेष म्हणजे, आरोपी तेवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी पीडितेचा आणि तिच्या मित्राकडचा किंमती ऐवज आणि महत्त्वाची कागदपत्रं हिसकावून घेतली. हा सगळा ऐवज परत देण्यासाठी आरोपींनी दहा हजाराची मागणीही केली.
यानंतर 10 मार्च रोजी हे पैसे घेण्यासाठी आलेल्या आरोपी सुनिल मानेला पोलिसांनी अटक केली. आरोपीला न्यायालयानं 15 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement